घरी ठेवलेले रेतीचे ढीग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:46+5:30

रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही अहेरी तालुक्यातील महागाव बु. येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार ओतारी यांनी शुक्रवारी महागाव बुज येथे भेट दिली असता, नागरिकांच्या दारासमोर रेतीचे ढिग पडले असल्याचे दिसून आले.

Seized sand dunes kept at home | घरी ठेवलेले रेतीचे ढीग जप्त

घरी ठेवलेले रेतीचे ढीग जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देमहागाव बु. येथे कारवाई : गुन्हा दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तहसीलदारांच्या नेतृत्वातील पथकाने महागाव बु. येथील नागरिकांनी घरी जमा करून ठेवलेली जवळपास ६० ब्रास रेती जप्त केली आहे. विशेष म्हणजे, घरी जमा केलेली रेती जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही अहेरी तालुक्यातील महागाव बु. येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार ओतारी यांनी शुक्रवारी महागाव बुज येथे भेट दिली असता, नागरिकांच्या दारासमोर रेतीचे ढिग पडले असल्याचे दिसून आले. रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, नागरिकांकडे रॉयल्टी आढळून आली नाही. त्यांच्याकडील रेती जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गौणखनिज साठा अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तहसील प्रशासनाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. सदर कारवाई तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी संतोष श्रीरामे, एकनाथ चांदेकर, तलाठी राजेंद्र आव्हाड, विनोद कावठी, सचिन मडावी, फिरोज मडावी, कोतवाल तिरूपती मेश्राम यांच्या पथकाने केली. जप्त केलेली रेती अहेरी तहसील कार्यालयात जमा केली जाणार आहे. या रेतीचा लिलाव केला जाईल. तसेच संबंधिताना नोटीस बजावली जाईल, अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

प्राणहिता नदीतून रेतीचा उपसा
प्राणहिता नदी घाटाचा लिलाव झाला नसतानाही मागील काही महिन्यांपासून नदी घाटातून राजरोसपणे वाळूचा उपसा सुरू आहे. ट्रॅक्टर, बैलबंडी आदी साधनांच्या सहाय्याने रेतीची चोरी केली जात आहे.
 

Web Title: Seized sand dunes kept at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू