नागपंचमी हा नागदेवतांचा सण म्हणून ओळखला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारला अनेक भाविकांनी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पूजा-अर्चा केली. परंतु आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील महादेव पहाडीवर असलेल्या मंदिरात भाविकांना नागपंचमीच ...
यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जून ...
पेसा कायद्यामुळे या जिल्ह्यातील ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे असूनही या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी लोकसंख्येनुसार आरक्षण देण्याची मागणी केली. त्यानुसार या जिल्ह्यातील ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी पेसा कायद्यात सुध ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने आष्टी येथील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. चंद्रपूर-आष्टी मार्गावरील या नदीच्या पुलावर पाणी चढले होते. भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरही दोन दिवस पाणी होते. त्यानंतर शनिवारच्या सायंकाळपासून ...
ओबीसी आरक्षण व जिल्ह्यातील विविध समस्यासंदर्भातील येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव संतप्त झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरमोरीला येत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दरम्यान आरमोर ...
येथील प्राणहिता नदीच्या पुलापासून धर्मपुरी गावापर्यंतच्या ८०० मीटरचा रस्ता दुरूस्तीनंतर अवघ्या दोन महिन्यात खराब झाला. भेगा पडल्याने वाहनधारकांना त्रास होत होता. या संदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने ...
महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या व विकासापासून कोसोदूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील योगीता मारोतराव वरखडे या विद्यार्थिनीने पीएचडीसाठी थेट अमेरिकेत झेप घेतली आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकलेली एक विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी पहिल्यांदा अमेरिकेला ...
शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. ...
शहरातील भूमिगत पुलाच्या शेजारी रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका वेडसर महिलेने निरागस बालकाला जन्म दिला. प्रसुतीच्या वेदनेने विव्हळत असलेल्या या महिलेवर शहरातील डॉक्टर चंद्रकांत नाकाडे यांनी तत्परतेने उपचार करून तिची प्रसुती केली. नवजात बालक व मह ...
गोंडवाना विद्यापीठात पुरेसे पद्व्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिध्दार्थ विन ...