Mud empire on the streets | रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य
रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

ठळक मुद्देगावकरी त्रस्त : गोलागुड्डम चेकमधील परिस्थिती बिकट

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील गोलगुड्डम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोलगुड्डम चेक येथील वार्ड क्रमांक ३ मधील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गोलगुड्डम गावातील काही रस्त्यांवर गिट्टी व मुरूम सुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पायवाटेप्रमाणे रस्त्यांवर माती पसरली आहे. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोलगुड्डम चेक येथील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार्ग काढताना विद्यार्थी, शेतकरी, दुचाकीस्वार कमालीचे त्रस्त आहेत. कधी पाय घसरून पडतील, याची शाश्वती नाही. चिखलामुळे डास व दुर्गंधीत वाढ झाली आहे.
या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी मधुकर मोर्ला, महेश गुर्ला, सालुबाई मोर्ला, किष्टूबाई मोर्ला लसमाबाई मोर्ला, गंगाधर मोर्ला आदींनी केली आहे.

Web Title: Mud empire on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.