Heavy rains in Gadchiroli district; Hundreds of villages lost contact | गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शेकडो गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शेकडो गावांचा संपर्क तुटला

ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना

श्रीधर दुग्गीरालापाटी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडविली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील सर्व नाल्यांना पूर आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कमलापूर रेपनपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असून हा मार्ग कालपासून बंद आहे. परिणामी शेकडो लहान गावे, वस्त्या या संपर्कापासून तुटल्या आहेत. कालपासून सुरू झालेला पाऊस सध्याही हे वृत्त लिहिस्तोवर जोरात सुरू होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोवणी केलेली रोपे वाहून गेली आहेत तर काही शेतात पाणी साठून ती सडण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: Heavy rains in Gadchiroli district; Hundreds of villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.