शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पारडी कुपीतील धान खरेदी केंद्र २० दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST

गडचिराेली : तालुक्यातील पारडी कुपी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर केवळ १५ दिवस खरेदी करण्यात आली. त्यानंतर ...

गडचिराेली : तालुक्यातील पारडी कुपी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर केवळ १५ दिवस खरेदी करण्यात आली. त्यानंतर गाेदाम भरल्याचे कारण सांगून खरेदी बंद करण्यात आली. पारडीसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी अद्यापही धानाची विक्री केली नाही. त्यामुळे लवकर खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक विश्वनाथ तिवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पारडी कुपी येथे मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने धान खरेदी केली जात आहे. यावर्षी उशिरा धान खरेदीला सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनी केंद्रावर धानाची विक्री केली. परंतु जेमतेम १५ दिवस खरेदी केंद्र सुरू हाेते. येथील गाेदाम पूर्ण भरल्याने धान खरेदी बंद करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही धानाची विक्री केली नाही. या हंगामातील धान खरेदी बंद हाेण्यासाठी केवळ दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याचा धाेका नाकारता येत नाही. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पैशाची टंचाई जाणवत आहे. त्यातच खरेदी केंद्र बंद झाल्याने धान विक्रीसाठी कुठे न्यावे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. परिसरातील जवळपास २००पेक्षा अधिक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारडीतील आधारभूत धान खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक तिवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. व्यवस्थापकांना निवेदन देताना आनंद नागाेसे, विकेश भजभुजे, तानाजी मुरतेली, नेताजी लाेंढे, गिरीधर मुरतेली, चंद्रशेख, मुरतेली उपस्थित हाेते. निवेदनावर ४७ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.