शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील धान करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 01:29 IST

धान पीक निसवले असतानाच खोडकिड्याचे आक्रमक झाल्याने धानपीक करपायला सुरूवात झाली आहे.

खोडकिडा व भारनियमनाचा परिणाम : देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : धान पीक निसवले असतानाच खोडकिड्याचे आक्रमक झाल्याने धानपीक करपायला सुरूवात झाली आहे. यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. इटीयाडोह धरणाच्या माध्यमातून देसाईगंज व आरमोरी तालुक्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. मागील वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे इटीयाडोह धरणात सर्वसाधारण चांगला जलसाठा होता. त्यामुळे देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. आजपर्यंत धानाचे पीक चांगले जोमात आले होते. सद्य:स्थितीत धानाला लोंब आले आहेत. अशा स्थितीत धानावर खोडकिड्याने प्रादुर्भाव केला आहे. खोडकिडाही रस शोषणारी अळी असल्याने धानाचे पीक करपण्यास सुरूवात झाली आहे. धान निसवण्याच्या मार्गावर असतापासूनचा खोडकिड्याने आक्रमण केले आहे. धान निसवले तरीही खोडकिड्याचा प्रादुर्भाव कायम आहे. हातात आलेले पीक जाऊ नये यासाठी शेतकरी वर्गाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महागड्या किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. तरीही रोग आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नाही. खोडकिड्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे किटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचे हजारो रूपये खर्च होत आहेत. खोडकिडा लागल्यामुळे धानाचे लोंब न भरताच बाहेर पडत आहेत. या धानामध्ये तांदूळच राहत नसल्याने सदर लोंब बेकामी ठरणार आहे. आजपर्यंत हिरवेगार दिसणारे पीक ऐन वेळेवर करपण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी धानाच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशातून खरीप हंगामाचा खर्च भागविला जातो. मात्र उत्पादनातच कमालीची घट होणार असल्याने खरीप हंगामाच्या खर्चासाठी शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभे होण्याची वेळ आली आहे. जवळपास ५०० हेक्टरवर खोडकिड्याचा प्रादुर्भाव आहे. उन्हाळी धानाच्या उत्पादनात ६० टक्के घट होण्याची शक्यता खोडकिड्यामुळे उन्हाळी धानाच्या उत्पादनात किमान ६० टक्के घट होण्याची भिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फतीने व्यक्त केली जात आहे. देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, कोकडी, फरी, कुरूड, कोंढाळा, तुळशी, पोटगाव, शंकरपूर, कोरेगाव, चोप, बोडधा, एकलपूर टोला, सावंगी या भागातील धान पिकावर खोडकिड्याने प्रादुर्भाव केला आहे. आरमोरी तालुक्यातीलही काही गावांमधील उन्हाळी धान पिकाला खोडकिड्याचा फटका बसला आहे. यावर्षी पहिल्यांदाच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली. मात्र ऐन वेळेवर धान पीक करपत चालले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता आहे.