शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कोरोना रूग्णांचे शतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM

शनिवारी रात्री उशीरापर्यंत २२ सीआरपीएफ जवान व भामरागड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच वेळी २३ रूग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला. अशातच पुन्हा रविवारी सायंकाळी १८ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी ४१ रूग्णांची भर पडली.

ठळक मुद्देरविवारी आढळले ४१ रूग्ण : बाधितांचा आकडा पोहोचला ११५ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २२ सीआरपीएफ जवान व १९ सामान्य नागरिक असे एकूण ४१ जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी कोरोना बाधीतांची संख्या ११५ पोहोचली आहे. एकाच दिवशी रूग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तर नागरिकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शनिवारी रात्री उशीरापर्यंत २२ सीआरपीएफ जवान व भामरागड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच वेळी २३ रूग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला. अशातच पुन्हा रविवारी सायंकाळी १८ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी ४१ रूग्णांची भर पडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी कोरोना रूग्णांची भर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.१८ बाधीतांमध्ये दोन महिला व १६ पुरूषांचा समावेश आहे. यामध्ये अहेरी येथील एक पुरूष तीव्र जोखमीचा आहे. तो अहेरी येथीलच एका कोरोना बाधीताच्या संपर्कात आला होता. इतर १७ जणांमध्ये तामिळनाडू राज्यातून ट्रकने आलेले आठ कामगार, ठाणे येथून आलेले तीन नागरिकांचे एक कुटुंब, वाशिमवरून परतलेले दोघांचे कुटुंब, हैदराबाद येथून आलेला एक जण, अरूणाचल प्रदेशातून आलेला बीएसएफचा जवान, जम्मू-काश्मिर येथून आलेला सीआरपीएफचा जवान व दिल्ली येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील एक, धानोरा तालुक्यात पाच, एटापल्लीतील तीन, चामोर्शीतील एक, गडचिरोली तालुक्यातील सात, तर अहेरी तालुक्यातील एक आहेत. ११५ कोरोना रूग्णांमध्ये २६ सीआरपीएफचे जवान, दोन बीएसएफचे जवान, ४३ कामगार व अन्य ४४ व्यक्तींचा समावेश आहे. एकूण ११५ रूग्णांपैकी आठ रूग्णांच्या नोंदी दुसºया जिल्ह्यात झाल्या असल्याने गडचिरोली जिल्ह्यात १०७ कोरोना रूग्णांची नोंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.नागरिकांनी सतर्क राहावे -जिल्हाधिकारीजिल्ह्यातच एकाच दिवशी सुमारे ४१ रूग्णांची भर पडल्याने नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष सतर्क राहावे. विनाकारण घराबाहेर टाळावे. तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधावा. जिल्ह्याबाहेरून आलेल्यांच्या नोंदी प्रशासनाकडे कराव्यात. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या