शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी माेर्चाला संघटनांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST

ओबीसी माेर्चाला भारतीय मुस्लिम परिषदेने पाठिंबा दर्शविला आहे. या महामाेर्चात भारतीय मुस्लिम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. जावेद ...

ओबीसी माेर्चाला भारतीय मुस्लिम परिषदेने पाठिंबा दर्शविला आहे. या महामाेर्चात भारतीय मुस्लिम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. जावेद पाशा सहभागी हाेणार आहेत. माेर्चादरम्यान स्टाॅल लावून सामाजित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या महामाेर्चात भारतीय मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयक एजाज शेख, रहिम शेख, लतीफ रिजवी, नासिर शेख, वसीम पठाण, लियाकत सय्यद, शाहीद पठाण, जुबेर पठाण, जादीश पठाण, अर्शद पठाण, सय्यद कादरी, सिकंदर पठाण, सैफ पठाण, अरबाज पठाण, शहबाज शेख, शाेएब पठाण, हामीद शेख, शाहदाब शेख यांनी केले आहे.

माेर्चात सहभागी हाेण्याचे राकाॅं ओबीसी सेलचे आवाहन

विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या माेर्चात माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राकाॅं ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर यांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३८ टक्केच्यावर ओबीसींची संख्या आहे. असे असतानाही केवळ सहा टक्के आरक्षण दिले जात आहे. हा ओबीसी समाजावरील अन्याय आहे. ओबीसी समाजावरील अन्याय दूर सावरण्यासाठी या माेर्चात माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विनायक झरकर यांनी केले आहे. माेर्चात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, जिल्हा निरीक्षक डी. के.आरिकर, प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद्र बाेरकुटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सुरेश रामगुंडे, ॲड. मेघा रामगुंडे आदी सहभागी हाेणार आहेत.

बहुजन कल्याणमंत्री वडेट्टीवार ओबीसी माेर्चात सहभागी हाेणार

२२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी माेर्चात मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार सहभागी हाेणार आहेत. यासाेबतच राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे नेते प्राचार्य डाॅ. बबनराव तायवाडे हे देखील सहभागी हाेणार असल्याची माहिती जिल्हा ओबीसी माेर्चा समन्वय समितीने दिली आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. अनेक दिग्गज या मोर्चात सहभागी होणार आहेत. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याची गर्जना केली आहे. अत्यल्प आरक्षण, शिष्यवृत्ती यासह ओबीसींच्या विविध प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे, त्याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी कळविले आहे.