रात्रकालीन व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:38+5:302021-02-05T08:48:38+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक मो. युनूस शेख हाेते. प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव शहजाद ...

Opening of the night volleyball tournament | रात्रकालीन व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

रात्रकालीन व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक मो. युनूस शेख हाेते. प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव शहजाद शेख, राकाॅंचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, सोहेल शेख, अब्दूल लतीफ शेख, सारिका गडपल्लीवार, श्रीनिवास मगडीवार, राकाॅं तालुकाध्यक्ष क्षितीज ऊके, डॉ. गौरव शहारे, पत्रकार आरिफ शेख, इलियास खान उपस्थित होते.

रात्रकालीन व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला ३३ हजार ३३३, उपविजेत्याला २२ हजार २२२, तृतीय विजेत्याला ११ हजार १११ रुपये तर चाैथे बक्षीस ५ हजार ५५५ रुपये राेख दिले जाणार आहेत. व्हाॅलिबाॅल स्पर्धेत पंच म्हणून राहुल सोरर्ते आणि दानिश खान हे काम पाहत आहेत. २९ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन मंगेश गुरफुले तर आभार रियाजुल शब्बीर यांनी मानले.

Web Title: Opening of the night volleyball tournament