शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

ओपीडीला एक तास विलंब डॉक्टर लेटलतिफ

By admin | Updated: June 30, 2015 02:22 IST

स्थानिक कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर

दिगांबर जवादे/दिलीप दहेलकर /गोपाल लाजुरकर ल्ल गडचिरोलीस्थानिक कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यातील रूग्ण दररोज मोठ्या संख्येने औषधोपचारासाठी येतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची गर्दी असते. सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत रूग्णालयाच्या ओपीडीचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. मात्र बाह्य रूग्ण विभागातील वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचारी तब्बल एक तास उशिरा कर्तव्यावर येतात. परिणामी नागरिकांना तास-दीडतास डॉक्टरांची आरोग्य सेवेकरिता प्रतीक्षा करावी लागते. बाह्य रूग्ण विभागाच्या परिसराची सफाई कर्मचाऱ्यांकडून सकाळी ९ वाजेपर्यंत स्वच्छता सुरू राहते. त्यामुळे बाह्य रूग्ण विभागाचा प्रवेशद्वारही सकाळी ९ वाजेपर्यंत बंद असतो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या अनेक रूग्णांना प्रवेशद्वारासमोर ताटकळत राहावे लागते, असे काहीसे चित्र लोकमत चमूने सोमवारी सकाळी ८.१५ ते १० या वेळेत बाह्य रूग्ण विभागात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले. लांब अंतरावरून आलेल्या वृध्द नागरिक, गरोदर माता व बालकांनाही डॉक्टरांच्या लेटलतीफपणामुळे मनत्रास सहन करावा लागतो, असे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.९.१० वाजता महिला रुग्णांच्या नोंदणीस प्रारंभबाह्यरुग्ण विभागात कोणत्याही डॉक्टरकडे रुग्णाला उपचार घ्यायचा असल्यास संबंधित रुग्णाला सर्वप्रथम पाच रूपये देऊन नोंदणी विभागात नोंदणी करून घ्यावी लागते. ८.५१ वाजता बाह्यरुग्ण विभागाचा दरवाजा उघडताच रुग्णांचा लोंढा सर्वप्रथम नोंदणीच्या ठिकाणी गेला. पुरूषांची नोंदणी करणारा कर्मचारी उपस्थित असल्याने पुरूषांच्या नोंदणीस सुरुवात झाली. मात्र महिलांची नोंदणी करणारा कर्मचारी ९.१० वाजतापर्यंत आला नाही. परिणामी महिलावर्ग रांगेत ताटकळत उभ्या असल्याचे दिसून आले. काही महिलावर्ग पुरूषांची नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला महिलांची नोंदणी करणारा कर्मचारी कधी येणार याबद्दल विचारत होते. ९.१० वाजता संबंधित कर्मचारी आल्यानंतर नोंदणीला सुरुवात झाली. अनिल रूडे यांचा फेरफटकाजिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी सोमवारी सकाळी ९.१० वाजता बाह्य रूग्ण विभागात येऊन फेरफटका मारला. कोणत्या विभागातील कोणते डॉक्टर तसेच कर्मचारी आले, आरोग्य सेवेचे काम सुरू झाले काय, याची चाचपणी डॉ. रूडे यांनी यावेळी केली. त्यांनी येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले.८.५१ वाजता उघडले रूग्णांसाठी प्रवेशद्वारजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागाचे मुख्य प्रवेशद्वार रूग्णांकरिता ८.५१ वाजता उघडण्यात आले. त्यानंतर प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या रूग्णांनी आतमध्ये नोंदणी कक्षात येऊन नोंदणीस प्रारभ केला.