शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययन-अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST

गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. या सभेत ऑनलाईन पध्दतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया राबविण्याबाबत मंथन करण्यात आले.

ठळक मुद्देप्राचार्यांच्या बैठकीत मंथन । तांत्रिक सुविधा कराव्या लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ हे पदवी व पद्व्युत्तर विभागाचे शैक्षणिक सत्र लांबणीवर पडले आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रथम सत्रातील अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. तशी चर्चा विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन स्वरूपात घेतलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत करण्यात आले.गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. या सभेत ऑनलाईन पध्दतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया राबविण्याबाबत मंथन करण्यात आले.तंत्रज्ञान प्लॅटफार्मची निर्मिती, शैक्षणिक साहित्य, अभ्यासक्रमाचे मॅपिंग करणे, विद्यार्थ्यांना क्रेडीटसाठी लॅब तयार करून देणे, चर्चा करून आराखडा तयार करणे आदी बाबींवरही चर्चा झाली. सदर ऑनलाईन सभेत कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व विद्या शाखेचे अधिष्ठाते आणि परीक्षा संचालकांनी सहभाग घेतला होता.२० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजनकोरोना महामारीमुळे महाविद्यालय तसेच विद्यापीठाचे विविध शैक्षणिक विभाग सुरू होण्यास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. कोरोनाचे संकट न हटल्यास हा कालावधी पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया, अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया राबविण्याचा मानस विद्यापीठाने व्यक्त केला आहे. प्राचार्यांसमवेत झालेल्या ऑनलाईन सभेत यावर चर्चा झाली. आॅनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया राबवून किमान २० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात महाविद्यालयातील वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दती राबविण्यासाठी महाविद्यालयांना व्हॉटस्अ‍ॅप व मेलच्या माध्यमातून तांत्रिक सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे. विविध प्रकारचे अ‍ॅप्स तयार करून विद्यार्थ्यांना लिंक द्यावी लागणार आहे. स्वयंपोर्टलसारखे तंत्रज्ञानही वापरावे लागणार आहे.नेटवर्क अभावी उडणार फज्जाएटापल्ली, अहेरी, सिरोंचा तालुक्यात केवळ बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दुरध्वनी सेवा आहे. मात्र बीएसएनएलचे कव्हरेज राहत नसून कनेक्टिव्हीटीची अडचण आहे. ऑनलाईन कामे करताना महाविद्यालय प्रशासनाला प्रचंड अडचणी येत आहेत. कव्हरेज नसल्यामुळे एटापल्ली तालुक्यात ऑनलाईन अध्ययन, अध्यापन प्रक्रिया घेणे शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन.बुटे यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नाहीत. सर्व विद्यार्थी स्वगावी परतले आहेत. अहेरी उपविभागातील सर्वच पाच तालुक्यात कव्हरेज व कनेक्टिव्हीटीची मोठी समस्या असल्याने या भागात आॅनलाईन शिक्षण पध्दती यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :universityविद्यापीठ