शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचारी संपावर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:51 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी...

तीन दिवस कामबंद : राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनगडचिरोली : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने १८ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान तीन दिवस संप पुकारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रलंबित मागण्यांचे निवेदन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीला १५० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवस संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आली. निवेदन देताना जिल्हा समन्वय समितीचे दुर्वेश सोनवाने, महेश आव्हाड, जिल्हा समान्वय समितीचे अध्यक्ष विजय मुळीक, सचिव डॉ. प्रशांत आखाडे, कार्याध्यक्ष शालिक पडघन, मनमोहन चलाख आदी उपस्थित होते. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करून सेवा निवृत्तीचे वय ६० करावे, दोन वर्षाची बालसंगोपन रजा करावी, राज्यातही केंद्राप्रमाणे १०, २० व ३० वर्षांच्या सेवा कालावधीनंतर त्रिसदस्यीय ‘सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करावी, रिक्तपदे भरण्यात यावी, लोकप्रतिनिधींच्या दबावातून कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करू नये, कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या पगारावर चाललेले शोषण बंद करून कायमस्वरूपी त्याची नियुक्ती करण्यात यावी, चक्राकार विभागवार बदली पद्धतीतून महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना वगळण्यात यावे, पती-पत्नी एकत्रिकरणासाठी एक वर्ष थांबण्याची अव्यवहार अट काढून टाकण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. १८ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या संपामध्ये अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.