शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संस्कार केंद्राची अवदशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:09 IST

चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.

ठळक मुद्देपुन्हा सुरू करण्याची गरज : सिरोंचातील अनेकांचे आयुष्य घडविले

आनंद मांडवे।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.६० च्या दशकात सय्यद सत्तारचाचा यांच्या मालकीच्या दोन खोल्यांमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले होते. या संस्कार केंद्रामध्ये शासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमला होता. संस्कार केंद्रातील संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जात होता. त्यामुळे सिरोंचासह परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी येत होते. दिवस-रात्रभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल राहत होती. या संस्कार केंद्राने अनेकांचे आयुष्य घडविले आहे. काही कालावधीनंतर तहसील कार्यालयाच्या परिसरातील ब्रिटीशकालीन आॅफिसर्स क्लबमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. त्यालगतच्या पटांगणात सिंगल बार, डब्बल बार हे व्यायाम प्रकार दिसत होते. व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, कबड्डी यासारखे मैदानी सामने सुद्धा रंगत होते. बुद्धीबळाचे डाव इमारतीच्या वºहांड्यात जमू लागले. बुद्धीबळाची जागा काही दिवसांनी रमीने घेतली. त्यामुळे राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडा यांची जागा किंग, राणी, गुलाम, एक्का, नहला, दहला यांनी घेतली. रमी खेळतानाही रम कधी आली हे कळलेच नाही. रम, रमीचे डाव रंगत असताना तहसील कार्यालयाच्या परिसरातील संस्कार केंद्र मालगुजारी बंगल्याजवळ स्थानांतरित झाले. मात्र काही दिवसातच शासनाने दिलेला कर्मचारी काढून घेतला. संस्कार केंद्रासाठी मिळणारा निधी बंद केला. तेव्हापासून संस्कार केंद्राची अवदशा सुरू झाली.सदैव शुभ्र वस्त्रे परिधान करून संपूर्ण गावाला आदर्शाचे धडे देणाºया शांताराम बापूंच्या पिंजरातील उत्तरार्धातल्या श्रीधरपंत गुरूजींसारखी त्याची अवस्था झाली. खप्पड चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीप्रमाणे आता संस्कार केंद्रावर झाडी उगवल्या आहेत. पांढºया फटक भिंती बेवड्यांच्या लक्तरांसारख्या मळकट झाल्या आहेत. बेवारस कुत्रे, मांजर, उंदीर, घुशींचे आश्रयस्थान बनले आहे. वºहांड्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. युवा मंडळींनी विरंगुळ्यासाठी आता कालेश्वराची वाट धरली आहे. त्यामुळे या संस्कार केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे.आयुष्य घडलेल्यांचे डोळे पाणावतातसंस्कार केंद्रातून शिस्तीचे बाळकडू मिळाल्याने जीवनात यशस्वी झालेल्या नागरिकांना संस्कार केंद्रातील दिवस अजूनही आठवतात. यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ध्यैर्य, चिकाटी, सहनशीलता याच संस्कार केंद्राने शिकविले. संस्कार केंद्रामुळे आपण प्रगती साधली, मात्र संस्कार केंद्राची अवदशा बघून त्यांच्या डोळे पाणावतात.संस्कार केंद्रात दारूमुक्तीचेही धडे दिले जात होते. या केंद्रामुळे शेकडो नागरिकांनी दारूला रामराम ठोकून उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचविले.