शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST

बुधवारला नवीन ३४ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ९९६६ झाली आहे. हा आकडा १० हजारांचा पल्ला गाठण्यासाठी आता केवळ ३४ रुग्ण बाकी आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बुधवारी केवळ ७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून ती आता २६७ वर गेली आहे. 

ठळक मुद्देनवीन ३४ कोरोनाबाधित आढळले तर केवळ ७ कोरोनामुक्त

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिराेली जिल्ह्यात महिनाभरापासून पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली आहे. १० महिन्यात प्रथमच दिवसाला एकही कोरोनारुग्ण आढळला नसल्याची स्थिती महिनाभरापूर्वी होती. पण आता हा आकडा पुन्हा प्रतिदिन ३० रुग्णापेक्षा पुढे गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.बुधवारला नवीन ३४ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ९९६६ झाली आहे. हा आकडा १० हजारांचा पल्ला गाठण्यासाठी आता केवळ ३४ रुग्ण बाकी आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बुधवारी केवळ ७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून ती आता २६७ वर गेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित ९९६६ पैकी ९५९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या २६७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जण रुग्णालयात तर काही घरीच विलगीकरणात आहेत. आतापर्यंत एकुण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण २.६८ टक्के आहे. नवीन ३४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९, अहेरी तालुक्यातील १, आरमोरी तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, कोरची तालुक्यातील ३,  वडसा तालुक्यातील ३, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ७ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ६, तर वडसा मधील एका जणाचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये  कॅम्प एरिया १, मुरखळा १, रामपुरी वार्ड १, जामामजीद १, शाहु नगर २, स्थानिक १, बजरंग नगर १, रेड्डी गोडाऊन चौक ३, रिलायंस पेट्रोल पंप १,  नवेगाव १, कनेरी १, महिला कॉलेज जवळ १,नवेगाव ग्रामसेवक कॉलनी १, इग्लीश स्कुल जवळ आनंद नगर २, आदिवासी ऑफीस आयटीआय डीपी जवळ १, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड १,  आमगांव २, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान नगर १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, वैरागड ३, वनकी १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक १,  धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बोदलदंड ३ जणांचा समावेश आहे.

महिनाभरात एकही मृत्यू नाहीजिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असली तरी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. ही थोडी दिलासा देणारी बाब ठरली आहे. आतापर्यंत १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. अर्थात त्यातील बहुतांश रुग्ण इतरही आजारांनी ग्रस्त होते. पण गेल्या महिनाभरात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या मृत्यूदर १.८ टक्के एवढा आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या