शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आता उपस्थिती भत्ता २०० रूपये

By admin | Updated: November 15, 2014 22:46 IST

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामसभेचा उपस्थिती भत्ता २५ रूपये देय होता़ अत्यल्प भत्ता मिळत असल्यामुळे कित्येक ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करीत होते.

ग्रा. पं. सदस्यांकरिता : सरसकट केली शासनाने आठ पट वाढदेसाईगंज : ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामसभेचा उपस्थिती भत्ता २५ रूपये देय होता़ अत्यल्प भत्ता मिळत असल्यामुळे कित्येक ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करीत होते. ग्रामसभेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने विकासात्मक धोरणातून भत्ता वाढ करण्याचे ठरविले होते. आता राज्य शासनाने ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत भत्त्यात सरसकट आठपट वाढ केली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात देखील शासनाने लोकसंख्येच्या आधारावर वाढ केली आहे़सध्या शहरीकरण वाढत चालले आहे़ कित्येक गावांची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे़ राज्यात एकूण २७९०६ ग्रामपंचायती आहेत़ मात्र वाढत्या शहरीकरणात देखील ५५ टक्के नागरिक अजूनही ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंंचायत राज व्यवस्थेतून प्रयत्न सुरू आहेत. पंचायतराज व्यवस्थेच्या योग्य मार्गदर्शकतत्त्वानुसार अनेक गाव स्वावलंबी झाली आहेत़ तरीही आदिवासी, अतिमागास क्षेत्रातील ग्रा. पं. सदस्य ग्रामविकासाच्या बाबतीत उदासीन आहेत़ कित्येक गावांत ग्रामसभा केवळ सोपस्कार झाले आहे़ यामुळे शासनाच्या विकासात्मक तत्वांना तडा जात आहे. ग्रामसभेतील उपस्थिती अत्यल्प असते. ग्रा. पं. चे सदस्य म्हणून निवडून आल्यावर देखील नाममात्र २५ रूपये उपस्थिती भत्ता मिळते, या सबबीमुळे सदस्य ग्रामसभेला अनुपस्थित राहतात. ग्रामविकासाकरिता सदस्यांना ग्रामसभेत उपस्थित राहिले पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने सदस्यांच्या भत्त्यात भरघोष वाढ केली आहे़ सदस्यांना २५ रूपये भत्त्यावरून आठपट वाढ झाल्याने सरसकट २०० रूपये उपस्थिती भत्ता देय राहणार आहे. वर्षभरात होणाऱ्या १२ ग्रामसभांना २०० रूपये प्रमाणे भत्ता ग्रामपंंचायत सदस्यांना मिळणार आहे़ भत्त्याप्रमाणेच सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी कित्येक दिवसापासून होत होती़ मिळणारे मानधन हे त्या गावातील लोकसंख्येवर आधारीत राहणार आहे़ देय असलेल्या मानधनात शासन ७५ टक्के रक्कम देणार असून ग्रा. पं. ला २५ टक्के रक्कमेचा वाटा उचलावा लागणार आहे़ (वार्ताहर)