शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
4
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
5
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
6
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
7
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
8
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
9
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
10
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
11
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
12
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
13
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
14
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
15
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
16
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
17
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
18
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
19
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
20
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर नऊ तास चढून वाचविला स्वत:चा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

नदीच्या पुलावरून जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. याच पाण्यातून त्यांनी दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊन एका झाडाला अडकली. दोघेही वाहून जात असताना नाल्यातील झाडाच्या फांदीला अडकले. या फांदीच्या आधाराने दोघेही झाडावर चढले. पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याजवळ नव्हता.

ठळक मुद्देमुस्का येथील घटना : गावकऱ्यांनी शनिवारी रात्री १२ वाजता जाऊन दोघांना काढले पुरातून बाहेर

घनश्याम म्हशाखेत्री ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पुराच्या पाण्यात वाहून जात असताना झाडाचा आसरा मिळाला. त्याच झाडावर रात्रभर थांबून दोघांनी स्वत:चा जीव वाचविला. सदर घटना धानोरा तालुक्यातील मुस्का येथील आहे. त्या दोघांनाही गावकऱ्यांनी ७ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजता सुखरूप बाहेर काढले. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. याचा प्रत्यय या दोघांच्या बाबतीत आला.
मुस्का येथील विनोद बोरकर व मनोहर बोरकर हे दोघे जण गावाजवळच असलेल्या सालेभट्टी येथे काही कामानिमित्त दुचाकीने शनिवारी सकाळी गेले होते. काम आटोपून दुपारी ३ वाजता गावाकडे परत येत होते. गावाजवळून डेडरी नदी वाहते. या नदीच्या पुलावरून जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. याच पाण्यातून त्यांनी दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊन एका झाडाला अडकली. दोघेही वाहून जात असताना नाल्यातील झाडाच्या फांदीला अडकले. या फांदीच्या आधाराने दोघेही झाडावर चढले. पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याजवळ नव्हता. हे दोघेही पुरात अडकल्याची माहिती गावकºयांना मिळाली. मात्र पुराने वेढा घातला असल्याने गावकरी सुध्दा मदत करू शकत नव्हते. घटनास्थळ गावापासून दीड किमी अंतरावर होते. बचावाचे कोणतेही साधन गावकºयांजवळ उपलब्ध नव्हते. पूर थोडा कमी झाल्यानंतर सरपंच शालिक गावडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तिरूपती कोल्लुरी यांनी इतर गावकºयांच्या मदतीने घटनास्थळ गाठले. सुमारे कंबरभर पाण्यातून मार्ग काढत दोघांनाही सुखरूप वाचविले. बचाव कार्यात पंकेश गावडे, आकाश गावडे, संतोष मोहुर्ले, जितेंद्र मोहुर्ले, युवराज पटणे, राजू मोहुर्ले, अक्षय मोहुर्ले, शंभूलाल चाटारे, जगन मोहुर्ले, अल्पेश मोहुर्ले, विश्वनाथ मोहुर्ले, राजकुमार पटणे, तनवीर बोरकर, भाऊराव बोरकर, ऋषी बोरकर यांनी मदत केली. पूर ओसरल्यानंतर रविवारी दुचाकी आणण्यात आली.
बचाव साहित्याची मागणी
मुस्का गावाला दर पावसाळ्यात पुराचा वेढा बसतो. आवश्यक कामानिमित्त गावकºयांना जीव धोक्यात घालून बाहेर जावेच लागते. एखादा व्यक्ती पुरात अडकला असल्यास त्याला काढावे लागते. यासाठी ग्रामपंचायतीने तसेच इतर विभागाने नागरिकांना पुरापासून बचावाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर