शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज

By admin | Updated: January 10, 2017 00:55 IST

देशामध्ये दरवर्षी वाढत चालले अपघात लक्षात घेता देशातील प्रत्येक नागरिकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभगडचिरोली : देशामध्ये दरवर्षी वाढत चालले अपघात लक्षात घेता देशातील प्रत्येक नागरिकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वच बाबी प्रशासनावर सोडून चालणार नाही. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांमध्ये घट करणे शक्य आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २८ वा रस्ता सुरक्षा सप्ताह ९ ते २३ जानेवारीदरम्यान राबविला जात आहे. या सप्ताहाचा शुभारंभ ९ जानेवारी रोजी करण्यात आला. यानिमित्त इंदिरा गांधी चौकातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, जिल्हा परिवहन समिती सदस्य कृष्णा म्हस्के, कार्यकारी अभियंता कुंभार, डॉ. जितेंद्र गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड म्हणाले, जपानमध्ये एक लाख नागरिकांमागे चार व्यक्ती, इंग्लडमध्ये तीन व्यक्ती व भारतात ११ व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू होतो. इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात अपघाताचे प्रमाण व त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र अपघातांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही बाब शोभनिय नाही. ७५ टक्के अपघात वाहन चालकाच्या चुकीमुळे, पाच टक्के अपघात दुसऱ्या वाहनचालकांच्या चुकीमुळे तर तीन टक्के अपघात पादचारींमुळे होतात, असे मार्गदर्शन केले.एसडीपीओ डॉ. सागर कवडे म्हणाले, केवळ पंधरवडा सप्ताह साजरा करून चालणार नाही, तर वाहन चालवितेवेळी आपली जबाबदारी व कर्तव्य याचे भान वाहनचालकांनी ठेवले पाहिजे. वाहन चालविताना मद्यपान टाळावे, वेगाने वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता वाढते. रात्रीचा प्रवास टाळावा, पावसाळ्यात वेगाने वाहन चालवू नये, अपघात झाल्यानंतर सदर व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीला पोलीस त्रास देणार नाही, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आलापल्ली आयटीआयचे प्राचार्य सुरेश जोग, विजय काळबांधे, भास्कर मेश्राम, ठाणेदार विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. कविता मोहोरकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)