चोप : देसाईगंज तालुक्याच्या काेरेगाव चाेप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे.
ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ पैकी ७ उमेदवार निवडून आलेल्यांना स्पष्ट बहुमत होता. १६ फेब्रुवारीला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी नितीन लाडे व उपसरपंच पदासाठी प्रकाश डोंगरवार यांनी अर्ज दाखल केला. त्यांची बहुमताने सरपंच व उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त सदस्य मनीषा भाऊराव उईके, गायत्री विजय उपरीकर, माहेश्वरी गुलाब तुमराम, निर्मला प्रभाकर उपरीकर, सुनीता सरोज मुद्दलकर, नूतन सहारे, लाहिराम तीतीरमारे, किशोर केळझरकर, शीतल धर्मेंद्र लाडे, यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मोटघरे, तलाठी रामटेके, ग्रामसेवक मेघा राऊत व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित हाेते. नवनिर्वाचित सरपंच नितीन लाडे व उपसरपंच प्रकाश डोंगरवार यांच्या विजयाचा जल्लाेष करण्यात आला.