शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

नव्यांना संधी; जुन्यांना धक्का

By admin | Updated: May 3, 2015 01:05 IST

पहिल्या टप्प्यात २४ एप्रिल रोजी मतदान झालेल्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आदी तीन तालुक्यातील ५० ग्रामपंचायत ....

गडचिरोली : पहिल्या टप्प्यात २४ एप्रिल रोजी मतदान झालेल्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आदी तीन तालुक्यातील ५० ग्रामपंचायत व दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी मतदान झालेल्या आठ तालुक्यातील २३९ अशा एकूण २८९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शनिवारी तालुका मुख्यालयास्थळी चोख पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील ग्रा.पं.च्या ३०५ व दुसऱ्या टप्प्यातील ग्रा.पं.च्या चार हजार १० अशा एकूण अशा एकूण पाच हजार ४१५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला निकालानंतर झाला. जिल्ह्याच्या ग्रा.पं. निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तर जुन्या सदस्यांना पराभव पत्कारावा लागला.
आलापल्लीत नाविस भाजपला हादरा; राकाँचे वर्चस्व
अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या गटाचे विजयी झाले आहेत. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम गटाचे तीन आदिवासी विद्यार्थी संघ (दीपक आत्राम गट) एक, काँग्रेसचा एक सदस्य विजयी झाला आहे. धर्मराव बाबा गटाच्या उमेदवार पुष्पा रमेश अलोणे ह्या सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. निवडून आलेल्या जुन्या सदस्यांमध्ये माजी पं.स. सदस्य रवी मुप्पीडवार, माजी सरपंच सतिश वेलादी, संतोष तोडसाम, पुष्पा अलोणे, कैलाश कोरेत आदींचा समावेश आहे. काँग्रेसचे शेख सलिम शेख खालीद हे विजयी झाले आहेत.
आलापल्ली ग्रा.पं. निवडणुकीच्य रिंगणात नऊ महिला उतरल्या होत्या. यापैकी आठ महिला नव्यानेच मैदानात उतरल्या होत्या, हे विशेष.
आष्टीत भाजपला हादरा, शहर विकास आघाडीचा झेंडा
चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठ्या १५ सदस्यीय आष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आष्टी शहर विकास आघाडीचे १२ उमेदवार विजयी झाले असून या ग्रा.पं. निवडणुकीत भाजपाला हादरा बसला. राकेश बेलसरे हे वॉर्ड क्रमांक दोन व वॉर्ड क्रमांक पाच या दोन्ही जागेवरून प्रचंड मतांनी निवडून आले. आष्टी ग्रा.पं. निवडणुकीच्या रिंगणात ७६ उमेदवार होते. माजी जि.प. सदस्य भाजपाचे पदाधिकारी दिवाकर कुंदोजवार यांना पराभव स्वीकारावा लागला.सरपंच पदासाठी रस्सीखेच होणार
आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या १३ सदस्यीय वैरागड ग्रा.पं.मध्ये एकाही पॅनलला चार सदस्यांचा आकडा पार करता आला नाही. खुल्या प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे. वैरागड ग्रा.पं.मध्ये नल्लू आत्राम अविरोध निवडून तर विजयी झालेल्या १२ उमेदवारांमध्ये नलिनी सहारे, मनेश्वर मडावी, अंतकला बोदेले, नामदेव धनकर, अतुल मेश्राम, गवळी सोमनानी, माधुरी बोडणे, संगिता धनकर, श्रीराम अहीरकर, पांडुरंग बावणकर, वसुधा तावेडे, संजय खंडारकर आदिंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत सरपंच सेवानंद सहारे पराभूत झाले आहे.