नागेपल्लीत दोन घरे फोडली, लाखावर ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 12:57 IST2017-10-01T12:57:02+5:302017-10-01T12:57:15+5:30

In Nagespally, two houses were damaged | नागेपल्लीत दोन घरे फोडली, लाखावर ऐवज लंपास 

नागेपल्लीत दोन घरे फोडली, लाखावर ऐवज लंपास 

आलापल्ली (गडचिरोली)-  शनिवारी रात्री 9 च्या सुमारास चोरट्यानी गडचिरोली जिल्ह्यातील नागेपल्ली येथील शिव शिक्षक कॉलनीतील 2 घरे फोड़ून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. शिव शिक्षक कॉलोनीतिल ही अलीकडील पाचवी चोरीची घटना आहे. त्यामुळे चोरटयांच्या हैदोसाने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

नागेपल्ली येथील वासुदेव कोठारे व विश्वनाथ वेलादी हे दसऱ्यानिमित्त अहेरीला गेले असताना रात्री 9 च्या सुमारास चोरत्यांनी घराच्या मागच्या बाजूने येऊन दरवाजाचे कुलुप तोडले. त्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त करुन
वासुदेव कोठारे यांच्या घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रूपयांची रोकड़ लंपास केली. त्याचप्रमाणे त्यांच्या बाजुचे रहिवासी असलेले विश्वनाथ वेलादी यांच्या घरातील 3 मोबाइल फ़ोन, 3 एटीम कार्ड, 50 हजार रोकड़,सोन्याची अंगठी, झुमके असा ऐवज लंपास केला आहे.

Web Title: In Nagespally, two houses were damaged

टॅग्स :Crimeगुन्हा