शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमगाव- सावरगाव मार्गाची दुर्दशा

By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST

धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या सावरगावपर्यंतच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना

मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या सावरगावपर्यंतच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेला व दुर्गम तालुका म्हणून धानोराची ओळख असली तरी या मार्गावरून छत्तीसगड राज्यातील जड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. सहा महिन्यांपूर्वी मुरूमगाव ते कुलभट्टीपर्यंतच्या ७ किमी मार्गाची दुरूस्ती खासगी ठेकेदाराकडून करण्यात आली. मात्र सदर रस्तासुद्धा सहा महिन्यांतच रखडला आहे. सावरगाव ते कुलभट्टी या मार्गाची तर मागील २ ते ३ वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. नेहमी जड वाहने या मार्गावरून जात असल्याने या मार्गावरील संपूर्ण डांबर उखळून गेले आहे. मात्र साधी डागडूजीसुद्धा प्रशासनाने केली नसल्याने दिवसेंदिवस या मार्गावरील खड्ड्यांचा आकार वाढतच चालला आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी धानोरा तालुक्यातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे केली. मात्र सदर भाग नक्षलग्रस्त असल्याने काम करण्यास ठेकेदारच मिळत नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. सावरगाव पर्यंतच्या ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी धानोरा येथे राहूनच सेवा देतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दररोज ये- जा करावे लागते. मात्र मार्गाची दुर्दशा झाली असल्याने याचा त्रास या वाहनधारकांनाही सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे सदर मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी मुरूमगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)