शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची कर वसुली ५५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 01:24 IST

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या कर विभागाने सन २०१६-१७ या चालू वर्षात आतापर्यंत गृह व पाणी कर

गडचिरोली नगर परिषद : गृह व पाणी कर मिळून ४ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम जमा दिलीप दहेलकर  गडचिरोली स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या कर विभागाने सन २०१६-१७ या चालू वर्षात आतापर्यंत गृह व पाणी कर मिळून एकूण ४ कोटी १७ लाख १५ हजार ८७१ रूपयांची कर वसुली केली आहे. गडचिरोली पालिकेची कर वसुली ५५ टक्क्यांवर पोहोचली आहे. गडचिरोली पालिकेची शहरातील नागरिकांकडे जुनी व चालू वर्षाची मिळून एकूण ३ कोटी ९६ लाख ८२ हजार ४२२ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. यापैकी पालिका प्रशासनाने सन २०१६-१७ वर्षात फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत २ कोटी १२ लाख ७३ हजार ५१९ रूपयांची वसुली केली. तसेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमवारपर्यंत ६ लाख ९० हजार रूपयांची मालमत्ता कर वसुली केली. पालिका प्रशासनाने आतापर्यंत एकूण २ कोटी १९ लाख ६३ हजार रूपयांची गृहकर वसुली केली आहे. तर १ कोटी ९७ लाख ५२ हजार ८७१ रूपयांची पाणी कर वसुली आतापर्यंत केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमवारपर्यंत ५ लाख ८८ हजार ७३३ रूपयांची पाणी कर वसुली करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या वर्षातील पाणी व गृहकराची वसुली ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत १०० टक्के करावी, असे निर्देश राज्य शासनाने गडचिरोली पालिकेसह जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कर वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या मार्गदर्शनात कर वसुलीचे तीन पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामध्ये कर निरीक्षक सुरेश भांडेकर यांच्यासह पाणीपुरवठा, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदर कर्मचारी दररोज शहरात घरोघरी फिरून कर वसुलीचे काम करीत आहेत. दिवसभर झालेल्या कर वसुलीचा आढावा सायंकाळी दररोज घेतला जात आहे. सन २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने पालिका प्रशासनाने कर वसुलीचे काम जोमात सुरू केले आहे. थकीत कर दात्यांना ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करून कराचा भरणा करण्यास सांगितले जात आहे. ध्वनीक्षेपकाचा अ‍ॅटो दिवसभर शहरात फिरत आहे. २० वर नळधारकांचा पाणी पुरवठा खंडीत जुनी थकीत व चालू वर्षाची पाणी कराची रक्कम शिल्लक असलेल्या शहरातील जवळपास २० वर नळधारकांचा नळ पाणीपुरवठा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने खंडीत केला आहे. सदर नळधारक जेव्हापर्यंत पाणी कराचा भरणा करणार नाही, तेव्हापर्यंत संबंधितांचा दैनंदिन नळ पाणीपुरवठा बंद राहील, असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे चार ते पाच दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने थकीत कर दात्यांचा नळ पाणीपुरवठा खंडित केला. त्यानंतर पाण्याची गरज लक्षात घेऊन लागलीच शहरातील काही नळधारक थेट रक्कम घेऊन पालिकेच्या कर विभागात पोहोचले व त्यांनी पाणी कराचा भरणा केला. त्यानंतर दुसरी दिवशी पालिका प्रशासनाने कर भरलेल्या संबंधित नळधारकांचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला. थकीत करदात्यांची नावे जाहीर होणार गडचिरोली पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कराबाबत एकूण ८७ घरांचे अधिपत्र तयार करून जप्ती वारंटची कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित कर दात्यांना तशी नोटीसही बजाविण्यात आली आहे. येत्या ५ दिवसानंतर संबंधित कर दात्यांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्यास संबंधित कर दात्याची नावे वर्तमान पत्रात प्रकाशित करून ती जाहीर करण्यात येईल, असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश थकीत करदाते लगबगीने पालिकेच्या कर विभागात जाऊन मालमत्ता व पाणी कराचा भरणा करीत आहेत. जप्ती वॉरंटबाबत ८७ घरांचे अधिपत्र तयार गडचिरोली शहराच्या सर्व २३ वॉर्डात बहुतांश नागरिकांकडे गृह कराची रक्कम थकीत आहे. सदर कर वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. थकीत कर दात्यांच्या एकूण ८७ घरांचे अधिपत्र पालिकेच्या कर विभागाने तयार केले आहेत. या अधिपत्रात मालमत्ता कराच्या रकमेचा उल्लेख आहे. महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १५२ व १५४ च्या तरतूदीस अधिन राहून थकीत कर दात्यांच्या जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पालिकेने दिलेल्या विहित मुदतीत संबंधित कर दात्यांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्यास संबंधितांचे घर व तेथील सामानाच्या लिलावाची कार्यवाही पालिका प्रशासन करणार आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने थकीत कर दात्यांच्या घर जप्ती वारंटीबाबतचे हे पाऊल उचलले आहे. कार्यालयीन सुटीच्या दिवशीही कर विभाग सुरू राहणार गडचिरोली शहरातील नागरिकांना गृह व पाणी कर भरण्यासाठी शासकीय सुटीच्या दिवशी पालिकेचा कर विभाग सुरू ठेवण्यात येत आहे. रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी नागरिक सदर कर विभागात येऊन कराचा भरणा करू शकतात, अशी माहिती पालिकेचे कर निरीक्षक सुरेश भांडेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. शासकीय सुटीच्या दिवशी पालिकेच्या कर विभागात दोन ते तीन कर्मचारी कर्तव्यावर ठेवले जात आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा आहे.