शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली राजवाड्यावर धडक

By admin | Updated: June 26, 2015 00:09 IST

आलापल्ली येथील मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह पालकमंत्र्यांचा बंगला व तहसील कार्यालयाला गुरूवारी धडक दिली व मॉडेल स्कूल सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.

अहेरी : आलापल्ली येथील मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह पालकमंत्र्यांचा बंगला व तहसील कार्यालयाला गुरूवारी धडक दिली व मॉडेल स्कूल सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.
केंद्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका अहेरी तालुक्यातील आलापल्ली मॉडेल स्कूललाही बसला. मॉडेल स्कूल बंद होत असल्याबाबतची माहिती प्राप्त होताच या विद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. गुरूवारी त्यांनी सर्वप्रथम पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक दिली. मात्र पालकमंत्री उपस्थित नसल्याने त्यांच्या प्रतिनिधीकडे निवेदन सादर केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. तहसीलदारांना निवेदन सादर करून याबाबत चर्चा केली. चर्चेदरम्यान आलापल्ली येथील मॉडेल स्कूल उत्तमरित्या सुरू होते. मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे या शाळेत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असल्याने सदर शाळा सुरू कराव्या, अशी मागणी शेकडो पालकांनी पालकमंत्री व तहसीलदार यांना दिलेल्या केली आहे. यावेळी सुधाकर तोडासे, किर्तीवंत तोरे, सत्यनारायण कुमरे, अशोक चालुरकर, आर. बी. पारेल्लीवार, टी. जी. दुर्गे, दशरथ गव्हारे, माधव राऊत, शामराव राऊत, ज्ञानेश्वर गोबाडे, बापू कोठारी, राजन्ना भूपल्लीवार, श्रीनिवास कन्नमवार, एस. के. नाझीर, सुशीला आडे, मनोंद्र बाला, पी. व्ही. मल्लेलवार, विश्वनाथ झाडे, अरूण ठाकरे, सपन हलदार, राजेश मोहुर्ले, विनायक बोरूले, अर्चना नगराळे, शहाजान पठाण, रोहिणी हाते, लक्ष्मी रामगिरवार, सुमित्रा खोब्रागडे, विमला मडावी, कल्पना लोखंडे, रमेश सांबाकार आदी उपस्थित होते.