शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला चामोर्शी तालुक्याच्या विकासाचा आढावा

By admin | Updated: January 7, 2015 22:52 IST

स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आ. डॉ. देवराव होळी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला.

चामोर्शी : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आ. डॉ. देवराव होळी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती सभापती शशिकला चिळंगे, उपसभापती केशव भांडेकर, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, धर्मप्रकाश कुकुडकर, कक्ष अधिकारी कागदेलवार, खुशाल वाढई, पांडुरंग वाढई, परशुराम पेरगुरवार, तुषार सातपुते, योगा टिकले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदारांनी प्रत्येक गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीविषयीची माहिती जाणून घेतली. ज्या गावांमध्ये विकास कामांना अजूनही सुरूवात झाली नाही, अशा गावांमध्ये तत्काळ विकास कामे सुरू करावी, असे निर्देश दिले. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे ग्राम स्वराज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राज्यशासनाने प्रयत्न सुरू केला असून त्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे. चामोर्शी तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथील कुऱ्हाडबंदी, गुरेचराईबंदी, बोअरवेल बंदी, श्रमदान, नशाबंदी, नसबंदी, लोटाबंदी, सामाजिक एकोपा, स्वच्छता व प्रशासकीय समन्वय आदी बाबतची माहिती जाणून घेतली. या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन इतर गावांनीही वाटचाल करावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश अधिकारी, संचालन शेषराव कोहळे तर आभार सरपंच भैय्याजी वाढई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)