शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गजबे यांचे दारूबंदीला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१मधील नगर पंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१मधील नगर पंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे, असे मत आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त करत जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. दारूबंदीमुळे जिल्ह्यातील दारूचे प्रमाण कमी झाले आहे. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा फायदा झालेला आहे. ही दारूबंदी टिकून राहावी, यासाठी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील हजाराहून अधिक गावांनी ठराव घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्याची विनंती केली आहे.

लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान विविध गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यानही आमदार कृष्णा गजबे यांनी दारूमुक्त निवडणूक व दारूबंदी मजबूत करण्याचा संकल्प केला होता. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा ८९, देसाईगंज २८, आरमोरी ४९, कोरची ९२ अशी एकूण २५८ गावे दारूबंदी टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने आगामी निवडणूकही दारूमुक्त व्हावी, यासाठी आमदार गजबे यांनी समर्थन दिले आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी, अशी मागणी केली आहे.