शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टीपेक्षा जादा मुरूमाचे खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना निर्गमित करून मुरूम खननाची परवानगी देण्यात आली होती. १६ ते २६ मे २०२० या कालावधीत मुरूमाचे खनन या रॉयल्टीच्या आधारे करावयाचे होते.

ठळक मुद्देनान्ही येथील प्रकार : तलाठ्याच्या पाहणीत ४४२ ब्रास मुरूम काढल्याचे आले निदर्शनास

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : एकीकडे प्रशासन कोरोनाचा प्रभाव नियंत्रित करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. याच बाबीचा फायदा घेत कुरखेडा तालुक्यातील मुरूम माफियांनी अवैधरित्या मुुरूमाचे खनन केल्याचे २३ मे रोजी तलाठ्याच्या पाहणीत दिसून आले आहे. २५ ब्रासची रॉयल्टी असताना तब्बल ४४२ ब्रास मुरूमाचे अवैधरित्या खनन केल्याचे उघडकीस आले आहे.देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना निर्गमित करून मुरूम खननाची परवानगी देण्यात आली होती. १६ ते २६ मे २०२० या कालावधीत मुरूमाचे खनन या रॉयल्टीच्या आधारे करावयाचे होते. दरम्यान २३ मे रोजी शनिवारला कुरखेडाच्या तलाठ्यांनी कुरखेडा-वडसा मार्गालगत नवीन प्लॉट व नक्षत्र लॉन येथे मुरूम टाकल्याबाबची चौकशी केली. परवानाधारकास २५ ब्रासची रॉयल्टी असताना तब्बल ४४२ ब्रास मुरूमाचे खनन केल्याचे तलाठ्याच्या लक्षात आले. ज्या भूभागात मुरूम खनन करण्याचा परवाना देण्यात आला होता. त्याच क्षेत्रात खनन न करता या शेतजमिनीस लागून असलेल्या गट क्रमांक ८ व १७३/१ आराजी ०.५० च्या झुडपी जंगल भागातून मुरूमाचे खनन केल्याचे आढळून आले. परवाना काढून गट क्रमांक ८ मधून ९६ ब्रास व गट क्रमांक १७३/१ मधून ३४६ असे एकूण ४४२ ब्रास मुरूमाचे अवैधरित्या खनन केल्याचे मोका पाहणीत तलाठ्यांना दिसून आले. तलाठ्यांनी पंचनामा करून कुरखेडाच्या तहसीलदारांकडे अहवाल सादर केला.यापूर्वीही येरंडीत झाले होते खननकुरखेडा तालुक्यात यापूर्वी येरंडी येथून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मुरूमाचे खनन करण्यात आल्याचे महसूल विभागाच्या पाहणीत दिसून आले. या प्रकरणी कुरखेडा येथील खुशाल बन्सोड या परवानाधारकावर १० लाखांचा दंड तत्कालीन तहसीलदारांनी ठोठावला होता. या दंडाबाबत खुशाल बन्सोड यांनी कुरखेडाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल सादर केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या अहवालाचे अवलोकन करत सदर दंड कायम ठेवला होता. त्यानंतर बन्सोड याने या प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे अपिल सादर केली. मात्र या अपिलावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.नान्ही परिसरात अवैध मुरूम खननाचे प्रकरण उजेडात आले असून कुरखेडाचे तहसीलदार संबंधितांवर कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अवैध मुरूम खनन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई न झाल्यास खनन करणारे व वाहतूक करणाऱ्यांची हिंमत वाढून हा प्रकार वाढत जाईल. परिणामी शासनाचा महसूल बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार