विरोधकांची स्पेस माध्यमांनी कायम ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:21+5:30

गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार देऊन ना.वडेट्टीवार यांचा शनिवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, नगराध्यक्ष योगिता पिपरे, ैडॉ. राजाभाऊ मुनघाटे, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद पिपरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रेस कल्बचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली होते.

Media must be maintained by the media space | विरोधकांची स्पेस माध्यमांनी कायम ठेवावी

विरोधकांची स्पेस माध्यमांनी कायम ठेवावी

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । प्रेस क्लबमध्ये रंगला गडचिरोली गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अलिकडे प्रसार माध्यमांच्या निष्पक्षपणावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह लावले जाते. माध्यमांनी सत्ताधाऱ्यांची वाहवाह करताना विरोधकांची स्पेस कायम ठेवली पाहीजे, अन्यथा लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत मदत व पुनर्वसन तथा ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार देऊन ना.वडेट्टीवार यांचा शनिवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, नगराध्यक्ष योगिता पिपरे, ैडॉ. राजाभाऊ मुनघाटे, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद पिपरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रेस कल्बचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली होते.
यावेळी बोलताना ना.वडेट्टीवार म्हणाले, मी गडचिरोलीत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे या जिल्ह्यासाठी बरेच काही करण्याची तळमळ आहे. त्यासाठी किमान पाच वर्षासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायची इच्छा असल्याचे ते म्हणाले. खातेवाटपाच्या वेळी कुठेही मी नाराज असल्याचे एका शब्दानेही बोललो नाही. पण काही गोष्टी न बोलताही श्रेष्ठींपर्यंत पोहचवता येतात हे त्यावेळच्या बातम्या पाहून लक्षात आले. राज्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर सीआरपीएफचे १० युनिय तयार करणार आहे. याशिवाय ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी दिला. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ना.वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिल धामोडे यांनी तर आभार प्रेस क्लबचे सचिव रूपराज वाकोडे यांनी मानले. प्रास्ताविक अविनाश भांडेकर यांनी केले.

पत्रकारांच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार
गडचिरोलीत सुसज्ज पत्रकार भवनासह पत्रकारांच्या निवासी संकुलाकरिता जागा मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असा शब्द यावेळी ना.विजय वडेट्टीवार यांनी दिला. त्यामुळे अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Media must be maintained by the media space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.