शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर राकाँचे वर्चस्व

By admin | Updated: December 26, 2016 01:27 IST

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी २४ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

 अहेरीत आठ जागा बळकावल्या : आविसला सात जागा अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी २४ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. रविवारी २५ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी झाले. आविसंचे अजय कंकडालवार यांच्या गटाचे सात उमेदवार तर भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवारास यश मिळाले आहे. एका जागेवर अपक्षाला विजय मिळविता आला. शनिवारी झालेल्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, सहकार या तिन्ही मतदारसंघातून ५७४ मतदारांपैकी ४५२ मतदारांनी मतदान केले होते. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होउन सिरोंचा व अहेरी बाजार समिती वेगवेगळ्या झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ३५१ मतदारांपैकी २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर व्यापारी मतदासंघातून ३९ पैकी ३४ जणांनी मतदान केले होते. सहकारी क्षेत्र संघातून १८४ पैकी १७५ मतदारांनी मतदान केले होते . विजयी उमेदवारांमध्ये सहकारी संस्था मतदार संघातून रवींद्र भागवंतराव आत्राम यांना १५४ मते मिळाली. सत्यनारायण वेंकटी एग्लोपवर यांना १४०, मदना नानाजी कोडापा यांना १३८, केशव कुल्ले कंगाली यांना १४६, मारोती लचमा दहागावकर यांना १४९, भीमा मुत्ता पेंदाम यांना १३३, नरंगो चैतू उसेंडी यांना १३३ मते मिळाली. सर्वसाधारण ग्रामपंचायत गटातून वैभव रामन्ना कंकडालवार यांना २६७, निर्मला अशोक येलमुले यांना २५०, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून रमेश शामराव वैरागडे यांना २७९ मते मिळाली. सहकारी संस्था महिला राखीव गटातून निर्मला अशोक मडावी यांना १५६, सोमी गोसावी सिडाम यांना १५२, विमुक्त जाती/ भटक्या जमाती गटातून मरम्मा संपत पोचम यांना १६६ मते मिळाली. व्यापारी- अडते गटातून विनोद वेंकटेश अंकनपल्लीवार यांना ३४, प्रशांत सुधाकर पत्तीवार यांना ३२, अनुसुचीत जाती/जमाती गटातून गजानन सिडाम यांना २८४ मते मिळाली. इतर मागासवर्गीय गटातून अजय रामन्ना कंकडालवार हे अविरोध निवडून आले. हमाल गटातून सेनवाज महेबूब शेख हे विरोध निवडून आले. (शहर प्रतिनिधी)