शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली नाही

By admin | Updated: August 25, 2016 01:02 IST

१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन गाव विकासाबाबत

कोरमचा अभाव : ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांची अनास्थागडचिरोली : १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन गाव विकासाबाबत चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासनाला दिले होते. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात गाव विकासाबाबत प्रचंड उदासीनता असल्याने कोरमअभावी जिल्ह्यातील १०० वर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभाच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ११ विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या विषयांचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला होता. यामध्ये बालकल्याण विभागाअंतर्गत ज्या अंगणवाडी केंद्रांना इमारत नसेल, त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे तसेच जीर्ण झालेल्या अंगणवाडी इमारतीचे निर्लेखन करण्याचे प्रस्ताव तयार करावे, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, कृषी विभागाअंतर्गत आदिवासी उपययोजना, अनुसूचित जाती उपययोजनेच्या लाभार्थ्यांची निवड करणे, मामा तलाव दुरूस्ती तसेच कोल्हापुरी साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करणे, दुरूस्ती करणे आदी विषय ठेवून त्यास ग्रामसभेची मंजुरी प्रदान करावी आदी बाबींचा समावेश होता. याशिवाय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाणीपुरवठा योजना, मुलींना सायकल वाटप, मनरेगाच्या कामाचा आराखड्याला मंजुरी देणे, निर्मल भारत अभियानातून शौचालयाची कामे तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या कार्यवाहीला मंजुरी देण्याचा विशेष सूचीमध्ये समावेश होता. गावाचा विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्याचा महत्त्वाचा अधिकार ग्रामसभेला शासनाने प्रदान केला आहे. मात्र अनेक गावात काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची मर्जी विकास कामात खपवून घेतली जाते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक मतदार ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)