शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडणारे अनेक शेतकरी सापडले अडचणीत

By admin | Updated: February 22, 2017 01:58 IST

परिसरातील रामपूर, आष्टा, पाथरगोटा, अतरंजी, सालमारा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीतील झाडे तोडून ती विटाभट्टीधारकांना विकली.

सातबारावर नोंदीचा अभाव : मालकी हक्कासाठी आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा जोगीसाखरा : परिसरातील रामपूर, आष्टा, पाथरगोटा, अतरंजी, सालमारा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीतील झाडे तोडून ती विटाभट्टीधारकांना विकली. त्यानंतर वन विभागाने विटाभट्टीवर धाड टाकून काही विटाभट्टी मालकांवर गुन्हा दाखल केला. पुन्हा शेतकऱ्यांची या प्रकरणी कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या मालकी हक्कानुसार त्यांच्या जमिनीतील आडजातीचे झाडे तोडण्यासाठी सरसकट परवानगी देण्यात यावी, या मागणीला घेऊन शेतकरी वन परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वनकायद्याची जाण नसलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या स्वमालकीच्या जमिनीतील स्वत: लावलेल्या झाडांची नोंदणी सातबारावर केली नाही. मात्र जास्त वय झालेल्या झाडाला फळ येत नसल्याने तसेच सदर झाडांचा धान्य व इतर पिकांसाठी धोका लक्षात घेऊन अशा झाडांना तोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. आंबा, मोह, कडूनिम या जातीचे झाडे तोडून ते विटा व्यावसायिकांना विकले. सदर झाडे वन विभागाच्या जंगलातील नव्हती. मात्र सदर झाडांची नोंद सातबारावर नसून वन विभागाकडे तोडण्याची परवानगी मागितली नाही. या कारणास्तव वन विभागाने कुठलीही चौकशी न करता वन कायद्यांतर्गत विटाभट्टी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. तसेच विटाभट्टी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून घेतलेला संपूर्ण माल वन विभागाच्या डेपोत जमा केला. विटा व्यावसायिकांवर कारवाई झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. शेतकऱ्यांचा मालकी हक्क असतानाही वन विभागाने ही कारवाई केल्याने शेतकरी तसेच विटाभट्टी व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले आहेत. दुसरीकडे वन विभागाच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड होते. मात्र वन विभागाचे संबंधित कर्मचारी यांचेवर तसेच तस्करांवर फारशी कारवाई होत नाही. आपल्या अधिकार व हक्कासाठी रामपूर, आष्टा, पाथरगोटा, अतरंजी, सालमारा येथील शेतकरी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतजमिनीतील झाडांची सातबारावर नोंद नसल्याने शेतकऱ्यांपुढे ही अडचण निर्माण झाली आहे. वन विभाग व महसूल विभागाच्या प्रभावी जनजागृतीअभावी स्वत:च्या शेतजमिनीतील नोंद अनेक शेतकऱ्यांनी सातबारावर केली नाही. (वार्ताहर)