शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्ताच्या तणावमुक्तीनंतर मनमुराद आनंद लुटला

By admin | Updated: September 17, 2016 01:45 IST

गडचिरोली पोलीस ठाण्यातील गणरायाला बंदोबस्ताच्या तणावमुक्तीनंतर शुक्रवारी अतिशय उत्साहात पोलीस

गडचिरोली पोलीस ठाण्याच्या गणरायाला निरोप : पोलीस व कुटुंबीय डीजेच्या तालावर मनसोक्त नाचले
गडचिरोली : गडचिरोली पोलीस ठाण्यातील गणरायाला बंदोबस्ताच्या तणावमुक्तीनंतर शुक्रवारी अतिशय उत्साहात पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार निरोप दिला.
गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणाला लागून पोलीस वसाहत आहे. या वसाहतीत श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. पोलिसांचे कुटुंब या गणेशोत्सवात मागील दहा दिवस उत्साहाने सहभागी झाले होते. घरातील पोलीस कर्मचारी सार्वजनिक गणेश मंडळांचा दहा दिवस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त सांभाळत असताना प्रचंड तणावात होता. गडचिरोली शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी गुरूवारी गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला. रात्री एक ते दीड वाजेपर्यंत हे विसर्जन चालले. पोलीस वसाहतीत असलेल्या या गणरायाला शुक्रवारी पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार निरोप दिला. जवळजवळ दुपारनंतर गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात डीजे लावून पोलीस कर्मचारी व त्याचे कुटुंबिय मनमुराद नाचले. त्यानंतर सजविलेल्या ट्रकवर सायंकाळी गणरायाला ठेवून गडचिरोली शहराच्या चंद्रपूर मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही पोलीस कर्मचाऱ्यांनी ढोलताशाच्या निनादात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबही डीजेच्या तालावर मनमुराद नाचले. गडचिरोली शहराच्या तलावात पोलिसांच्या या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक व इतर सर्व पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते. पोलीस विभागाचा गणपती विसर्जनासाठी नेण्यात येत असलेल्या वाहनाला फुलांची सजविले होते व गणराया विराजमान असलेल्या आसनाच्या पाठीमागे गर्दीत रूग्णवाहिकेला अवश्य जागा करून द्या, असा संदेश देणारा फलक लावण्यात आला होता. याशिवाय बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या महत्त्वाच्या विषयावरही जनजागृती करणारे फलक या वाहनावर ठेवण्यात आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)