शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शंकरनगरात फुलली मक्याची शेती

By admin | Updated: February 20, 2017 00:38 IST

जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे.

७० हेक्टर क्षेत्रावर लागवड : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीभिमराव मेश्राम जोगीसाखराजोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे. त्याचबरोबर रबी हंगामात भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्याला एप्रिल ते मे पर्यंत रोजगार उपलब्ध होणार असून लाखो रूपयांचे उत्पन्नही मिळण्यास मदत होणार आहे. शंकरनगर येथील शेतकऱ्यांची शेती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.जोगीसाखरापासून तीन किमी अंतरावर १९६५ मध्ये शंकरनगर हे गाव वसविण्यात आले. या गावात एकूण १२३ कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावातील नागरिक बांगला देशातील निर्वासीत असल्याने त्यांना शासनाकडून प्रत्येकी पाच एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कुटुंब वाढल्याने जमिनीचे तुकडे पडले. तरीही बंगाली समाजातील हा शेतकरी कधीच मागे हटला नाही. या शेतकऱ्यांनी स्वत:च्या मेहनतीने शेतात विहीर खोदली आहे. या विहिरीच्या माध्यमातून दरवर्षी विविध हंगामात विविध प्रकारची पिके हा शेतकरी घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण मका पिकासाठी चांगले असल्याने भरघोस उत्पादन होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून रबी हंगामात मका पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली. यावर्षी सुमारे ७० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. हिरवेगार मक्याची पिक या परिसरातील इतर शेतकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मका पिकाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचा बहाणा करीत बहुतांश शेतकरी खरीपातील धानाव्यतिरिक्त इतर कोणतेच पीक घेत नाही. यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. मात्र शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी हे कारण कधीचेच नाकारले आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून सिंचन करून रबी तसेच उन्हाळी पिकांचेही ते उत्पादन घेत आहेत. फळांचेही उत्पादन वाढलेशंकरनगर येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेतात. मक्याबरोबरच येथील शेतकरी कारले, चवळी, टमाटर, वांगे, आलू यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. शेतातील पारीवर आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. यातूनही येथील शेतकऱ्यांना बिनाखर्ची उत्पादन मिळण्यास मदत होते, अशी माहिती पुरंजन मंडल या शेतकऱ्याने दिली.शेतीमध्ये राबताना नशीबाला दोष न देताना आम्ही आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. शंकरनगर येथे पिकणारा दर्जेदार भाजीपाला, फळे, मका, आंबा नागपूर येथील बाजारपेठेत पाठविला जात आहे. मात्र कृषी विभागाचे आमच्या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीविषयची नवीन माहिती कृषी विभाग आपल्याला देत नाही. शेती हा व्यवसाय आहे. तो सर्व कुटुंबांनी मिळून चालवायचा आहे. जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी पाणी,खत वेळेवर द्यावे लागते.- सुप्रीया सुपेन बाला, शेतकरी, शंकरनगर