आईची अब्रू लुटताना रडणाऱ्या बाळाचे नाक दाबून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशी; सात वर्षांनी न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:35 IST2025-12-24T18:33:36+5:302025-12-24T18:35:40+5:30

सात वर्षांनी न्याय: मुलचेरा तालुक्यातील घटना, अहेरी सत्र न्यायालयाचा निर्णय

Man who killed crying baby by squeezing his nose to rape mother sentenced to death; Justice after seven years | आईची अब्रू लुटताना रडणाऱ्या बाळाचे नाक दाबून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशी; सात वर्षांनी न्याय

Man who killed crying baby by squeezing his nose to rape mother sentenced to death; Justice after seven years

गडचिरोली : विवाहितेवर अत्याचार करताना तिच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला जाग आली, तो जोराने रडू लागला, त्यामुळे त्याची तोेंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अहेरी अतिरिक्त सत्र न्या. प्रकाश आर. कदम यांनी २४ डिसेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली. मुलचेरा तालुक्यात ही थरारक घटना घडली होती. तब्बल सात वर्षांनी या प्रकरणात न्याय झाला. 

संजू विश्वनाथ सरकार (रा. कांचनपूर ता. मुलचेरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.मुलचेराच्या कांचनपूर येथे पीडित महिला पती व तीन वर्षांच्या मुलासोबत राहत असे. जून २०१७ मध्ये तिचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. इकडे घरी तीन वर्षांचा मुलगा व पीडित महिला असे दोघेच होते. याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने विकृत डाव आखला. १९ जून २०१७ रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजता त्याने घरात चोरीच्या मार्गाने प्रवेश केला.

महिला झोपेत असतानाच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तीन वर्षांचा मुलगा रडू लागल्याने आरोपीने त्या निष्पाप बाळाचे नाक व तोंड दाबून त्याचा जीव घेतला. आईने प्रतिकार करताच आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले व मृत्यूच्या दारात ढकलले.

आई शुध्दीवर आल्यावर घटनेला वाचा....

सकाळी घराचा दरवाजा उघडत नसल्याने गावकऱ्यांना संशय आला. भिंतीवरील मोकळ्या जागेतून घरात प्रवेश केल्यावर अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले. आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, तर तीन वर्षांचा चिमुकला खाटेवर मृतावस्थेत आढळून आला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने घडलेला थरारक घटनाक्रम सांगितला. तिला तत्काळ अहेरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे ठरले महत्त्वाचे

या प्रकरणी अहेरी ठाण्यात कलम ३०२, ३७६, ३०७ व ४५० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन उपनिरीक्षक संतोष वामे यांनी तपास करून पुढील तपास उपअधीक्षक गजानन टोम्पे यांनी केला. ठोस साक्षी, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.

या कलमांनुसार दोषी व शिक्षा

अतिरिक्त सत्र न्यायाधीश   प्रकाश आर. कदम यांनी आरोपीला कलम ३०२ अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच बलात्कार व खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांसाठी जन्मठेप, तर घरफोडी प्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधिसेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.


 

Web Title : गढ़चिरौली: हमला करते समय रोते बच्चे की हत्या के लिए आदमी को मौत की सजा।

Web Summary : गढ़चिरौली में एक व्यक्ति को 2017 में बच्चे की माँ पर हमला करते समय रोते हुए तीन साल के बच्चे की हत्या करने के लिए मौत की सजा सुनाई गई। अदालत ने उसे बलात्कार और हत्या के प्रयास के लिए आजीवन कारावास की भी सजा सुनाई।

Web Title : Gadchiroli: Man sentenced to death for murdering crying child during assault.

Web Summary : A Gadchiroli man received a death sentence for murdering a crying three-year-old while assaulting the child's mother in 2017. The court also sentenced him to life imprisonment for rape and attempted murder.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.