शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

मामेभाऊ आणि आत्येभावानेच केले 14 वर्षीय मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

ही मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिण भागातील एका शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोना काळामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पोळ्यानंतर काही आश्रमशाळा सुरू झाल्या. या मुलीची आश्रमशाळा महिनाभरापूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती दीड महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिच्या लैंगिक शोषणाचा प्रकार शाळेत येण्यापूर्वीच गावात असताना घडला असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका अल्पवयीन मुलीचे तिच्या मामेभावाने आणि आत्येभावानेच लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपण गर्भवती आहोत, हे त्या मुलीलाही माहीत नव्हते. आश्रमशाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत ही बाब उघडकीस आली. लैंगिक शोषण करणाऱ्यांपैकी एक सज्ञान, तर दुसरा आरोपी १६ वर्षांचा आहे. सज्ञान असलेल्या आरोपीला अटक केली, तर अज्ञान असलेल्या आरोपीला बाल न्यायालयाच्या आदेशानुसार आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.ही मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिण भागातील एका शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोना काळामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पोळ्यानंतर काही आश्रमशाळा सुरू झाल्या. या मुलीची आश्रमशाळा महिनाभरापूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती दीड महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिच्या लैंगिक शोषणाचा प्रकार शाळेत येण्यापूर्वीच गावात असताना घडला असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपीचा पीसीआर संपताच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

महिला व बाल रुग्णालयात उपचार

- पीडित मुलगी आश्रमशाळेत आल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच आश्रमशाळेच्या अधीक्षिकांसह सर्व जण अवाक् झाले. आश्रमशाळेत असताना ती गर्भवती झालीच कशी? या प्रश्नाने सर्वजण घाबरले होते. मात्र ती सहा आठवड्यांची गर्भवती असून गावात असतानाच तिचे शोषण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्या मुलीवर महिला व बाल रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला सुटी देण्यात आली. यावेळी एका  शिक्षिकेलाही रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते.

आणखी एक विद्यार्थिनी गर्भवतीविशेष म्हणजे, सदर पिडीत मुलीसह आणखी एक आश्रमशाळेची विद्यार्थिनी गर्भवती आढळल्याची माहिती आहे. तिलाही महिला बाल रूग्णालयात उपचारासाठी आणले हाेते. परंतु तिच्यावरील उपचार गुंतागुंतीचे असल्यामुळे  तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. या रूग्णालयात उपचार घेतलेल्या विद्यार्थिनीवर यशस्वी उपचार झाले असून तिची प्रकृती आता चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. लैंगिक शाेषणाचा हा प्रकार धक्कादायक ठरला आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाPoliceपोलिस