मक्केपल्ली-हळदवाही मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:35+5:30

चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गावर दिवसभर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ राहते.

The Makpally-Haldawi route is overrun | मक्केपल्ली-हळदवाही मार्ग उखडला

मक्केपल्ली-हळदवाही मार्ग उखडला

Next
ठळक मुद्देडांबरीकरणाची लागली वाट : बाहेर निघालेल्या गिट्टीमुळे अनेकांची वाहने होताहेत पंक्चर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिदुर्गम व दुर्गम भागातील रस्त्याची दुर्दशा झाली, यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. मात्र शहरी भागालगतचे व तालुका मुख्यालयाजवळून जाणारे मार्ग उखडले असल्याने रस्ता विकासाचे नियोजन फेल असल्याचे दिसून येत आहे. मक्केपल्ली-हळदवाही या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यास याचे प्रत्यय येते.
चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गावर दिवसभर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ राहते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर मार्गावर हळदवादी व मक्केपल्लीदरम्यान एक पूल आहे. हळदवाही गावानजीक असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूकडील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. गिट्टी बाहेर आली असल्याने अनेकांची वाहने पंक्चर होत आहेत. परिणामी या भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मक्केपल्लीसमोरील काही भागांमध्ये अधूनमधून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने मार्गाची वाट लागली. अतिवृष्टीमुळे हळदवाहीनजीकच्या पुलाची व मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्ता विकासासाठी कृतीशील नियोजन करावे व दुरूस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी हळदवाही, मक्केपल्ली परिसरातील नागरिकांनी केली आहे. घोट परिसरातील बऱ्याच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

Web Title: The Makpally-Haldawi route is overrun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.