एकदा गेलेला मोबाइल मिळत नाही पण सायबर पोलिसांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांना सुखद धक्का
By संजय तिपाले | Updated: November 11, 2025 15:59 IST2025-11-11T15:57:46+5:302025-11-11T15:59:37+5:30
सायबर पोलिसांच्या प्रयत्नांना यश : ‘एसपीं’च्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल सुपूर्द

Lost mobile phone cannot be recovered but cyber police's efforts are successful; citizens get a pleasant shock
गडचिरोली : बाजारात, बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविलेले तसेच प्रवासात व इतर ठिकाणी गहाळ झालेले तब्बल ९० मोबाइल शोधून काढण्यात सायबर पोलिसांना यश आले. ११ नोव्हेंबरला पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बैठक कक्षात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल सुपूर्द केले तेव्हा अनेकांना सुखद धक्का बसला.
वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत गडचिरोली सायबर पोलिस ठाण्याने एकूण ३३ लाख ६४ हजार ५६० रुपये किमतीचे तब्बल २१५ मोबाइल मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत. मोबाइल हरवल्यास तत्काळ कार्यवाही व तांत्रिक तपासाद्वारे शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व ठाण्यांना दिले आहेत. मागील वर्षी (२०२४) सायबर पोलिसांनी ११९ मोबाइल फोन शोधून परत केले होते. यंदा मात्र कामगिरीत वाढ करून जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले ९० मोबाइल शोधून काढले आहेत. तांत्रिक तपास करुन माग काढत हे मोबाइल परत मिळविण्यात आले.
मोबाइल शोधण्यात यांचे योगदान
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अरुण फेगडे, उपनिरीक्षक नेहा हांडे, हवालदार वर्षा बहिरवार, अंमलदार संजीव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर व सिद्धांत बुजाडे यांनी मोबाइल शाेधून काढण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
"मोबाइल चोरी गेल्यास किंवा हरवल्यास नागरिकांनी ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहा आणि फसवणूक झाल्यास १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक