शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांचे नुकसान

By admin | Updated: July 3, 2015 01:39 IST

येथील तहसील कार्यालय मार्गावरील गजाजन कृषी केंद्राला गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुकानातील संपूर्ण शेतीविषय साहित्य जळून खाक झाले.

घातपाताची चर्चा : कुरखेडात कृषी केंद्राला आगकुरखेडा : येथील तहसील कार्यालय मार्गावरील गजाजन कृषी केंद्राला गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुकानातील संपूर्ण शेतीविषय साहित्य जळून खाक झाले. यामुळे दुकानमालकाचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भरत बनपूरकर यांचे तहसील कार्यालय मार्गावर गजानन कृषी केंद्र दुकान आहे. या दुकानातून ते बियाणे, कीटकनाशके, खते विकत होते. तसेच झेरॉक्स मशिन व संगणकही तेथे होते. गुरूवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील धान, बिजाई खते, औषधी, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा, संपूर्ण फर्निचर, लाकडी दरवाजे, रेकार्डचे कागदपत्रे जळून खाक झाले.घटनेची माहिती होताच राम लांजेवार, चांगदेव फाये, विलास गावंडे, रामहरी उगले, नागेश फाये, रवींद्र गोटफोडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन शेजारच्या फिरोज पठाण यांच्या ताज वॉशिंग सेंटरमधील मोटारपंपाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. गुरूवारी दुकानाचे मालक भरत बनपूरकर यांनी कुरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. काही दिवसांपूर्वी बनपूरकर यांना चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याविषयीची तक्रारही त्यांनी पोलिस ठाण्यात केली होती. त्यामुळे दुकानाच्या जाळपोळीमागे कुणाचा तरी हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, धमकीनंतर बनपूरकर यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले होते. परंतु आगीत तेही जळाले. तलाठयांनी पंचनामा केला असून, पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)