शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील लाॅकडाऊनमुळे कारले झाले आणखी कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला परीसरात मागील काही वर्षापासून कारले या भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. सेंद्रीय खताचा वापर करून सदर पिक घेतल्या जात असल्याने व येथील कारले प्रत उच्च प्रतीची असल्याने लगतच्या चंद्रपुर, गोंदिया,भंडारा,नागपुर, गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश,तेलंगणा राज्यातुन मोठ्या प्रमाणात मागणी हाेते. 

ठळक मुद्देमाेहटाेला परिसरातील शेतकरी चिंतेत, मागणीसह भावही घटले

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज: तालुक्यातील किन्हाळा, माेहटाेला परिसरातील कारले नागरपूर येथील बाजारपेठेतून राज्याच्या अनेक भागात पाेहाेचतात. मात्र नागपूरात लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून कारल्यांची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम कारल्यांच्या भावावर झाला आहे. कारल्यांचे भाव गडगडल्यानें या परिसरातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला परीसरात मागील काही वर्षापासून कारले या भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. सेंद्रीय खताचा वापर करून सदर पिक घेतल्या जात असल्याने व येथील कारले प्रत उच्च प्रतीची असल्याने लगतच्या चंद्रपुर, गोंदिया,भंडारा,नागपुर, गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश,तेलंगणा राज्यातुन मोठ्या प्रमाणात मागणी हाेते. सुरुवातीला मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने येथील कारल्यांना जागेवर ४२ रुपये प्रती किलो  दर मिळु लागला होता. मात्र राज्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस  अधिकाधिक भर पडत असल्याने बाहेरच्या व्यापाऱ्यांनी येथील कारले खरेदीकडे पाठ फिरविली आहे.  यामुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकुणच होत असलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

व्यापारी घेत आहेत गैरफायदास्थानिक व्यापाऱी कारल्याच्या मागणीत घट झाल्याची सबब पुढे करत जवळपास पंधरा रुपये प्रती किलो दराने मागणी करु लागले आहेत. कारले पिक ऐन भरात असताना होत असलेली आवक पाहुन दर पाडुन खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून हाेत आहे. बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसत असतानाच खरेदीदारांनी कारले खरेदीकडे पाठ फिरवल्याने लावलेला उत्पादन खर्चही भरून निघण्याची आशा धुसर झाली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्या