शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
2
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
3
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
4
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
5
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
6
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
7
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
8
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
9
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
10
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
11
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
12
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
13
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
14
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
15
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
16
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
17
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
18
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
19
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
20
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

लिंकचे काम मंदावले

By admin | Updated: May 29, 2015 01:08 IST

राज्य निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदार कार्डासोबत आधारकार्ड लिंक करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू केले आहे.

दिगांबर जवादे गडचिरोली
राज्य निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदार कार्डासोबत आधारकार्ड लिंक करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. मात्र हे काम अजूनही गती पकडले नसून दोन महिन्यानंतरही केवळ ३.८७ टक्के मतदार कार्ड आधारकार्डासोबत लिंक झाले आहेत.
निवडणुकीच्या वेळी मतदान करताना मतदाराची ओळख म्हणून मतदार कार्ड अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानल्या जातो. निवडणूक विभागाकडून १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच त्यांचे मतदार कार्ड काढण्याचे काम हाती घेतले जाते व ही प्रक्रिया वर्षभर सुरू राहते. याचा गैरफायदा काही नागरिक उचलत असल्याचे दिसून आले आहे.
एकाच नागरिकाचे दोन जिल्ह्यात नोंदणी राहत असून त्याच्याकडे दोन मतदार कार्ड आढळून येतात. सदर मतदार दोन ठिकाणी मतदान करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ‘एक नागरिक, एक मतदान’ या भारतीय राज्य घटनेत असलेल्या तरतुदीचे उल्लंघन आहे. मात्र हे प्रकार सर्रास सुरू आहेत. या प्रकाराला आळा घालून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मतदार कार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबतच्या स्पष्ट सूचना जिल्हा निवडणूक विभागाला राज्य निवडणूक विभागाने दिल्या आहेत.
या सूचनांचे पालन करीत जिल्हा निवडणूक विभागाने मतदार कार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याचे काम दोन महिन्यापूर्वीच हाती घेण्यात आले आहे. हे काम गावपातळीवरील बीएलओच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बीएलओ प्रत्यक्ष मतदाराच्या घरी जाऊन त्याच्या आधारकार्डाच्या क्रमांकाची नोंद करून घेत आहे. तर काही बीएलओ आधारकार्डाची छायांकित प्रत मागत आहेत. ग्राम पंचायत निवडणुकीच्या कालावधीत मतदार कार्ड लिंक करण्यासाठी स्वतंत्र टेबल प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात आले होते. हे सर्व करूनही मतदार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पाहिजे त्या प्रमाणात गती पकडू शकली नाही.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकूण दोन लाख ३८ हजार ६९२ मतदार आहेत. त्यापैकी केवळ आठ हजार २१६ नागरिकांचे मतदार कार्ड आधारकार्डासोबत लिंक झाले आहेत. हे प्रमाण टक्केवारीमध्ये ३.४५ टक्के एवढे आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दोन लाख ७७ हजार १०० मतदार आहेत. त्यापैकी १२ हजार ५१२ मतदारांचे मतदार कार्ड लिंक झाले आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ४.५१ टक्के आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात दोन लाख १५ हजार ३१२ मतदार आहेत. त्यापैकी सात हजार ७१३ मतदारांचे मतदार कार्ड लिंक झाले आहेत. याची टक्केवारी ३.५९ आहे. संपूर्ण जिल्ह्यात सात लाख ३३ हजार १०५ मतदार आहेत. त्यापैकी २८ हजार ४४१ मतदारांचे कार्ड आधारकार्डासोबत लिंक झाले आहेत. जिल्ह्याची टक्केवारी ३.८७ टक्के एवढी आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीच्या वेळी प्रत्येक मतदार मतदान टाकण्यासाठी मतदान केंद्रावर येणार हे लक्षात घेऊन त्याच्या आधारकार्डाच्या क्रमांकाची नोंद करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र टेबल लावण्यात आला होता. मात्र मतदानाला येताना आधारकार्डाची झेरॉक्स आणावी, याचा प्रचार करण्यात निवडणूक विभागाला अपयश आले. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांनी नेहमीप्रमाणे मतदार ओळखपत्र आणले. मात्र आधारकार्डाची छायांकित प्रत आणली नाही किंवा क्रमांकाही लिहून आणला नाही. त्यामुळे ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यानही पाहिजे त्या प्रमाणात लिंकचे काम होऊ शकले नाही.
जनजागृतीचा अभाव
निवडणूक विभागाने गावपातळीवर आधारकार्डाची माहिती गोळा करण्यासाठी बीएलओ नेमले आहेत. मात्र आधारकार्ड देण्याविषयी नागरिकांमध्ये निवडणूक विभागाने पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती केली नाही. त्यामुळे नागरिक स्वत:हून बीएलओकडे आधारकार्डाची छायाकिंत प्रत नेऊन देत नाही. बीएलओला प्रत्यक्ष मतदाराच्या घरी जाऊन आधारकार्डाची छायांकित प्रत घ्यावी लागत आहे किंवा क्रमांकाची नोंद करावी लागत आहे. हे सर्व करताना बीएलओचीही दमछाक उडत आहे. काही कामचुकार बीएलओ नागरिकांच्या घरी जातही नाही. त्यामुळे दोन महिन्यानंतरही ही प्रक्रिया गती पकडू शकली नाही.