शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलने ऑनलाईन कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

महामार्गासाठी खोदकाम व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान बीएसएनएलची भूमिगत केबल लाईन तुटल्यामुळे कॉम्प्लेक्स परिसरात लिंक फेलची समस्या भारी झाली आहे. विशेष म्हणजे, बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात बरीच ऑनलाईन कामे प्रभावित झाली होती.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून समस्या । रस्ता खोदकामाने भूमिगत केबल तुटल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौकापासून कॉम्प्लेक्स पर्यंत तसेच नवेगावच्या पुढे सुध्दा राष्ट्रीय महामार्गासाठी खोदकाम व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान बीएसएनएलची भूमिगत केबल लाईन तुटल्यामुळे कॉम्प्लेक्स परिसरात लिंक फेलची समस्या भारी झाली आहे. विशेष म्हणजे, बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात बरीच ऑनलाईन कामे प्रभावित झाली होती.कॉम्प्लेक्स परिसरात शासनाच्या विविध विभागाचे अनेक कार्यालये आहेत. याशिवाय निमशासकीय कार्यालयाची संख्या कमी नाही. याशिवाय कॉम्प्लेक्स परिसरात गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांचे कार्यालय आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता गेल्या दोन-तीन वर्षात बहुतांश कार्यालयात ऑनलाईन कामे वाढली आहेत. वरिष्ठ कार्यालयाला विविध माहितींचे मेल पाठविणे, आलेले मेल अपलोड करणे, याशिवाय बँकांमार्फत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे संबंधित खात्यात पैसे वळते करणे ही सर्व कामे ऑनलाईन होतात. यासाठी इंटरनेटची गती व कनेक्टिव्हीटी चांगली असणे आवश्यक आहे. मात्र रस्ता खोदकामादरम्यान केबल तुटल्याने कनेक्टिव्हीटी खंडीत झाली. परिणामी लिंकफेलचा फटका सर्वच ठिकाणच्या ऑनलाईन कामांना बसला.गडचिरोली शहरात बीएसएनएलसह इतर काही खासगी कंपन्यांनी भूमिगत केबल लाईन टाकली आहे. मुख्य शहरात रस्ता खोदकामादरम्यान नळ पाईपलाईन तसेच भ्रमणध्वनीची केबल लाईनही बऱ्याच ठिकाणी तुटली. त्यामुळे ऑनलाईन कामांचा खोळंबा काही दिवसांपूर्वी झाला होता. दरम्यान बीएसएनएलच्या वतीने तुटलेली केबल जोडण्यात आली. आता कनेक्टिव्हीटीची गडचिरोली शहरात फारशी समस्या नाही. मात्र कॉम्प्लेक्स परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून ही समस्या भारी बनली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हीटी तसेच स्पीड राहत नसल्याने ऑनलाईन कामे करताना कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे. प्रशासनाने बीएसएनएलने केबल लाईन सुरळीत करावी, अशी मागणी आहे.बँक व्यवहार प्रभावितइंटरनेट कनेक्टिव्हीटी व लिंकफेलच्या समस्येमुळे कॉम्प्लेक्स परिसरातील राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी तसेच सहकारी सोसायट्यांचे ऑनलाईन व्यवहार शुक्रवारी पूर्णत: ठप्प पडले होते. विशेष म्हणजे, गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लिंकफेल असा फलक लावण्यात आला होता.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा