शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता वाढीचे शिक्षकांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण्यास पुढे आलेली आहेत.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : शालांत परीक्षेचा निकाल उंचवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांतील तसेच जिल्ह्यातील जि.प. हायस्कूलमधील इयत्ता दहावीला शिकविणाºया माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा रविवारी येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत पार पडली.आकांक्षित जिल्हा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून सदर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे म्हणाले, मागील वर्षी जिल्ह्यात इयत्ता दहावीचा निकाल कमी लागला त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थी कुठे कमी पडतो हे जाणून शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे. विद्यार्थी प्रगत झाले पाहिजे यासाठी शिक्षकांनी मनापासून काम करावे. यावर्षीचा निकाल उंचावण्यासाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता आहे. कार्यशाळेतून दिशा मिळते व पुढील उपाययोजना करता येतात. त्यासाठी शिक्षकांचा सामूहिक सहभाग व परिश्रम आवश्यक आहे.डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण्यास पुढे आलेली आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिकविलेला पाठ्यांश समजला की नाही याचा शिक्षकांनी शोध घेऊन परीक्षेसबंधात विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असाव्या. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांमध्ये इष्ट बदल होणे अपरिहार्य आहे.यावेळी डीआयईसीपीडीचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते, वैशाली येगलोपवार, पुनित मातकर, सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, मुख्याध्यापक डी. डी. शेंडे आदी उपस्थित होते.गडचिरोली प्रकल्पातील २४, अहेरीतील ११ व भामरागड प्रकल्पातील ८ अशा एकूण ४३ शासकीय आश्रमशाळातील तसेच जिल्ह्यातील १० जि.प. हायस्कूलचे एकूण २१५ माध्यमिक शिक्षकांचा या कार्यशाळेत सहभाग होता. या कार्यशाळेत सहभागी सर्व माध्यमिक शिक्षकांची शेवटी विषयनिहाय चाचणी घेण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळांतील व डीआईसीपीडीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षक