शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला मार्र्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा

By admin | Updated: March 4, 2016 01:20 IST

महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्च सोमवारपासून भरणाऱ्या मार्र्कंडा तिर्थस्थळावरील यात्रा सुरळीत व सुव्यवस्थित पार पडावी म्हणून सर्व प्रशासकीय...

यंत्रणा सज्ज : ग्रामपंचायतीला १ लाख १७ हजारांचा निधी प्राप्तचामोर्शी : महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्च सोमवारपासून भरणाऱ्या मार्र्कंडा तिर्थस्थळावरील यात्रा सुरळीत व सुव्यवस्थित पार पडावी म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीच्या उपविभागीय कार्यालयात गुरूवारी घेतली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार यू. जी. वैद्य, नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर, चडगुलवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता गावळ, जि.प. बांधकाम विभागाचे वझरकर, कुमरे, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, एसटी विभागाचे चौधरी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रेड्डी, वन विभागातर्फे नरखेडकर, पेंपकवार, मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, रामेश्वर सेलुकर, स्वप्नील वरघंटे, दिलीप चलाख, जयराम चलाख आदी उपस्थित होते. मार्र्कंडा ग्रामपंचायतीला १ लाख १७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. मार्र्कंडा यात्रेसाठी ३५० पोलीस व दीडशे गृहरक्षक असा एकूण ५०० जणांची सुरक्षा व्यवस्था राहणार असल्याचे पोलीस निरिक्षक किरण अवचार यांनी बैठकीत सांगितले. यात्रेसाठी ३६ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून मूल, गडचिरोली, आष्टी, चंद्रपूरसह इतरही मार्गावरून भाविकांची वाहतूक करण्यात येणार असल्याचे या बैठकीत एसटी विभागाचे चौधरी यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, विद्युत, आरोग्य, वन विभागाच्या प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या तयारीचा आढावा आमदारांपुढे ठेवला. पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे असलेल्या तयारीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मार्र्कंडा यात्रेत महिला प्रसाधन गृहाची व्यवस्था, महिला बचत गट मार्र्कंडाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे नियोजन बैठकीत मांडण्यात आले. भाविकांनी सर्व सोयीसुविधांचा लाभ घेऊन यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सर्व विभाग प्रमुखांनी केले आहे. यात्रा काळात सर्व सोयी दिल्या जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)