शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधीन होऊन मरण्यापेक्षा अन्यायाविरूद्ध लढण्यास शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:45 IST

देशाचे भवितव्य असलेली युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित असल्याचे विदारक चित्र आहे.

हेमलकसात रासेयो शिबिर : अनिकेत आमटे यांचे आवाहनभामरागड : देशाचे भवितव्य असलेली युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित असल्याचे विदारक चित्र आहे. परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. व्यसनाधीन होऊन मरण्यापेक्षा अन्यायाविरूद्ध लढण्यास शिका, असे आवाहन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी केले. राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालय भामरागडच्या वतीने हेमलकसा येथे सोमवारी आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रमोद घोनमोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे व्यवस्थापक दासरी, चिन्ना महाका, प्रा. संतोष डाखरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कैलास निखाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अनिकेत आमटे म्हणाले, जिल्ह्यातील युवा पिढीमध्ये दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. युवा पिढी व्यसनामध्ये आपली ऊर्जा विनाकारण खर्ची घालत आहे. व्यसनात गुरफटण्यापेक्षा युवकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची गरज आहे, असेही आमटे यावेळी म्हणाले. युवकांनी समाजसेवेचे व्रत घेऊन जीवन जगावे, असे प्रा. घोनमोडे यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ. कैलास निखाडे, संचालन सोनाली धानोरकर यांनी केले तर आभार सुनील दुर्गे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)