शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांची नेतृत्व कार्यशाळा

By admin | Updated: September 17, 2016 01:48 IST

कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेअंतर्गत मुख्याध्यापकांची दोन दिवसीय कार्यशाळा १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

५० जणांची उपस्थिती : भामरागडात कार्यक्रम
भामरागड : कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेअंतर्गत मुख्याध्यापकांची दोन दिवसीय कार्यशाळा १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेदरम्यान मुख्याध्यापकांना नेतृत्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डायटचे ज्येष्ठ अधीव्याख्याता डॉ. विनीत मत्ते उपस्थित होते. मुख्याध्यापकाला संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळावी लागते. वरिष्ठांच्या नियंत्रणात काम करण्याबरोबरच विद्यार्थी व शिक्षकांवर नियंत्रणसुद्धा ठेवावे लागते. ही दुहेरी जबाबदारी मुख्याध्यापकांना पार पाडावी लागते. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशनने तालुक्यातील मुख्याध्यापकांना नेतृत्वगुण विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला भामरागड तालुक्यातील ५० शाळांचे मुख्याध्यापक हजर होते.
याच कार्यशाळेदरम्यान पायाभूत चाचणीनंतरचे प्रयत्न, संकलीत एकची तयारी, शाळेची श्रेणी वाढविणे, शेवटचा विद्यार्थी प्रगत करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांनी तालुक्यातील शाळांबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी दरडमारे, शिक्षण विस्तार अधिकारी बद्रे, केंद्रप्रमुख गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)