शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ

By admin | Updated: October 1, 2014 23:23 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविला जात असून या अभियानाची सुरूवात आरमोरी येथील महात्मा गांधी कला,

आरमोरी : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविला जात असून या अभियानाची सुरूवात आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात १ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. भारत सरकारचा मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संधेला महाविद्यालयाच्या इमारतीची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियान २ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राबविल्या जाणार आहे. या कालावधीत ग्रामस्वच्छता, स्वच्छताविषयक प्रतिज्ञा, भित्तीचित्र प्रदर्शनी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन या संदर्भात प्रकल्प निर्मिती, व्याख्यानसत्र, परिसंवाद, पथनाट्य, स्वच्छता रॅली, गांधी संस्कार परीक्षा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात राबविले जाणार आहेत. १ आॅक्टोबर रोजीचे स्वच्छता अभियान राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विजय गोरडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. सदर अभियान यशस्वीतेसाठी डॉ. गोपाल तामगाडे, डॉ. विशाखा वंजारी, प्रा. सुरेश रेहेपाडे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. किशोर हजारे, प्रा. जयेश पापडकर, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. डॉ. वसंता कहालकर, प्रा. डॉ. विजय रैवतकर, हिरालाल मगरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. घर व परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. मात्र याबाबत नागरिकांमध्ये फारशी जनजागृती निर्माण झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रत्येक महाविद्यालयाला सदर कार्यक्रम राबविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम छेडली जाणार आहे. याचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)