शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

लहुजी मडावी अनंतात विलीन

By admin | Updated: August 17, 2016 01:42 IST

येथील ज्येष्ठ सर्वोदयी नेते, दलित मित्र लहुजी मंगुजी मडावी यांचे १५ आॅगस्ट रोजी दुपारी ३.१० वाजता वृद्धापकाळाने

१५ आॅगस्ट रोजी निधन : सर्वोदयी चळवळीचा आधारस्तंभ हरपला गडचिरोली : येथील ज्येष्ठ सर्वोदयी नेते, दलित मित्र लहुजी मंगुजी मडावी यांचे १५ आॅगस्ट रोजी दुपारी ३.१० वाजता वृद्धापकाळाने जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते १०० वर्षांचे होते. १६ आॅगस्ट रोजी कठाणी नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे सर्वोदयी चळवळीचा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या पश्चात आदिवासी सेवक घनश्याम मडावी हे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. लहुजी मडावी यांचा जन्म गडचिरोली येथे १ एप्रिल १९१७ रोजी झाला. त्यांनी सातव्या वर्गापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जून १९३८ पासून प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या नोकरीवर ते रूजू झाले. मात्र काही वर्षानंतर नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक चळवळीत स्वत:ला वाहून घेतले. १९८२-८३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने दलित मित्र या पुरस्काराने सन्मानित केले. २००१ मध्ये महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर यांचेकडून स्मृतीचिन्ह, २००१ मध्ये त्रिदर्शक स्मृती प्रमाणपत्र, २००३ मध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेअंतर्गत वीर बिरसामुंडा राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ते गडचिरोली जंगल कामगार सहकारी संस्थेचे १० वर्ष अध्यक्ष होते. ठाकूरदास बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात सर्वोदय चळवळीचा प्रचार करण्याची जबाबदारी लहुजी मडावी यांच्यावर सोपविली होती. मडावी यांनी सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश यांच्या विचारांचा प्रचार केला. गडचिरोली जिल्हा निर्मिती व जिल्ह्यात दारूबंदी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते डीसीसी बँकेचे संचालकही होते. १९८२ मध्ये त्यांनी गडचिरोली येथे राणी दुर्गावती कन्या विद्यालय सुरू केले. अंत्यसंस्काराच्या वेळी गुरूदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे, माजी खा. मारोतराव कोवासे, अ‍ॅड. मनिराम मडावी, आर. यू. केराम, कृष्णराव परतेकी, प्रभू राजगडकर, कुसूम आलाम, डॉ. शिवनाथ कुंभारे, रोहिदास राऊत उपस्थित होते.