शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

लगाम येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

बाह्य रुग्ण विभागात दर महिन्याला जवळपास १७०० ते २००० रुग्णांची तपासणी केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करणे, भरती असलेल्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे तसेच रुग्णालयाचा दैनंदिन प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉक्टर गेडाम यांची तारेवरची कसरत होत आहे. लगाम हे मुलचेरा तालुक्यातील मोठे गाव आहे. ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे.

ठळक मुद्देएमबीबीएस डॉक्टरची गरज : महिनाभरात २ हजार रुग्ण दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरचे पद रिक्त आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर जावेद शेख यांची दीड वर्षांपूर्वी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून प्रशासनाने एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली नाही. या रुग्णालयात केवळ बीएएमएस असलेले डॉ.संतोष गेडाम हे एकमेव डॉक्टर आहेत. बाह्य रुग्ण विभागात दर महिन्याला जवळपास १७०० ते २००० रुग्णांची तपासणी केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करणे, भरती असलेल्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे तसेच रुग्णालयाचा दैनंदिन प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉक्टर गेडाम यांची तारेवरची कसरत होत आहे. लगाम हे मुलचेरा तालुक्यातील मोठे गाव आहे. ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचारासाठी येतात. मात्र सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना अहेरी येथे वेळोवेळी रेफर करावे लागते. या रुग्णालयात येणारे रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. या ठिकाणची रुग्णांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी एक एमबीबीएस डॉक्टर व एक महिला बीएएमएस डॉक्टरची नियुक्ती आवश्यक आहे.

टॅग्स :docterडॉक्टर