शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामावर न गेलेल्या मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 01:44 IST

इटिया डोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग वडसा सिंचाई व्यवस्थापक कार्यालय आरमोरीच्या वतीने महात्मा गांधी

आरमोरी : इटिया डोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग वडसा सिंचाई व्यवस्थापक कार्यालय आरमोरीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या मायनरच्या कामावर काम करणाऱ्या वघाळा येथील मजुरांना अतिशय कमी मजुरी देण्यात आली. याउलट कामावर न गेलेल्या मजुरांची हजेरी लावून त्याच्या बँक खात्यात अधिकची रक्कम जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इटिया डोह प्रकल्पाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाच्या संगनमताने सदर प्रकार झाल्याचा संशय मजुरांनी व्यक्त केला असून काम करणाऱ्या मजुराचे आर्थिक शोषण करणाऱ्या व कामावर न जाणाऱ्या मजुराच्या खात्यात पैसे जमा न करणाऱ्यावर कारवाई करून कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वघाळा येथील संतप्त मजुरांनी केली आहे. इटिया डोह सिंचाई व्यवस्थापन कार्यालयातर्फे रोहयो अंतर्गत मायनर क्रमांक २ च्या नहराचे मातीकाम करण्यात आले. सदर माती कामाकरिता २२ लाख ७८ हजार ७४६ रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर नहराच्या कामावर वघाळाचे जवळपास अडीचशेवर मजूर काम करीत आहेत. या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या रोजगार सेवकाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाच्या संगनमताने कामावर न गेलेल्या मजुराची हजेरी लावून त्याची रक्कम बँकेच्या खात्यात जमा केली. मातीकामावर न जाणाऱ्या नऊ मजुरांना मस्टर क्रमांक १ मध्ये कामावर हजर असल्याचे दाखवून त्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी ९८४ रूपये जमा केले. जे मजूर प्रत्यक्ष कामावर होते त्यांना अत्यंत कमी मजुरी देण्यात आली. मस्टर क्रमांक २ मध्ये दोन मजूर कामावर नसताना सुध्दा त्यांच्या बँक खात्यात १ हजार १०४ रूपये जमा करण्यात आले. मस्टर क्रमांक १ मध्ये कमी मजुरी पडलेल्या मजुरांनी रोजगार सेवकांना मस्टर दाखविण्याची मागणी केली असता, मजुरांना मस्टर दाखविण्यास त्याने टाळाटाळ केली. (वार्ताहर)असा आला प्रकार उघडकीससंतप्त झालेल्या रोहयो मजुरांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा दोनाडकर यांना घटनास्थळी बोलाविले. त्यानंतर सरपंच दोनाडकर यांनी इटिया डोह सिंचाई व्यवस्थापन कार्यालय आरमोरीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चापले यांना बोलाविले. त्यांना मस्टरची कॉपी मागितली असता, सदर प्रकार उघडकीस आला. या मस्टरच्या कॉपीमध्ये कामावर न गेलेल्या मजुरांची नावे हजेरी पटावर दिसून आली. मंगळवारी सायंकाळी वघाळा येथील मजुरांनी ग्रामपंचायत गाठून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सरपंच दोनाडकर तसेच हिरा प्रधान, पुरूषोत्तम धोटे, किसन राऊत, रामभाऊ धोटे, अन्ना लिंगायत, पुंडलिक दोनाडकर, मुर्लीधर दोनाडकर, अरूण ढोरे, पुंडलिक बुल्ले आदी मजूर हजर होते.रोजगार हमी योजनेच्या कामावर रोजगारसेवक मजुरांची हजेरी घेतात. सिंचाई व्यवस्थापन कार्यालयातर्फे सध्या अनेक कामे सुरू असल्यामुळे सर्वच कामांवर १०० लक्ष देणे शक्य होत नाही. रोजगार सेवकाच्या चुकीमुळे सदर प्रकार झाला असावा.- सी. टी. चापले, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, इटिया डोह सिंचाई व्यवस्थापन कार्यालय, आरमोरी