कुरखेडाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:35+5:302021-02-05T08:53:35+5:30

कुरखेडा : येथील १६ धावपटूंची राज्यस्तरीय क्राॅस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गडचिराेली येथील एमआयडीसी मैदानावर निवड चाचणी घेण्यात ...

Kurkheda players beat in state level competition | कुरखेडाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत धडक

कुरखेडाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत धडक

कुरखेडा : येथील १६ धावपटूंची राज्यस्तरीय क्राॅस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गडचिराेली येथील एमआयडीसी मैदानावर निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत कुरखेडा येथील १६ धावपटूंची विविध गटात निवड झाली.

मुलांच्या खुल्या गटातून महेंद्र कचलाम, प्रकाश मिरी, नवनाथ मेश्राम, केतन कुमरे, योगेश बोईर, तर मुलींच्या खुल्या गटातून शीतल वाटगुरे, करिश्मा उईके, रिना भैसारे यांची निवड करण्यात आली. २० वर्षांखालील मुलांच्या गटातून पंकेश उईके, रोहित तिभागे, प्रमोद पुराम, तर मुलींमध्ये दीक्षा हुंडरा, १८ वर्षांखालील गटात पप्पू बोगा, कमलेश घाटघुमर, तर मुलींमधून प्रणाली कुंवर, अमिशा बोगा, १६ वर्षांखालील मुलांच्या गटातून पंकज कुमरे यांची निवड करण्यात आली. प्रशिक्षक देवेंद्र राणे व शैलेश हलामी यांच्या मार्गदर्शनात हे खेळाडू स्पर्धेची तयारी करीत आहेत. ३१ जानेवारी रोजी पुलगाव (पुणे) येथे आयोजित महाराष्ट्र स्टेट क्राॅस कंट्री चॅम्पियन स्पर्धेत हे खेळाडू सहभागी हाेणार आहेत.

Web Title: Kurkheda players beat in state level competition