शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरची ग्रामीण रुग्णालयात काेविड वॅक्सिनसाठी शीत साखळीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, आरमोरी आदी तालुक्यानंतर वडसा, धानोरा, कुरखेडा तालुक्यात सुद्धा लस टप्प्याटप्याने वितरण करून लस देण्यास सुरुवात झाली ...

गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, आरमोरी आदी तालुक्यानंतर वडसा, धानोरा, कुरखेडा तालुक्यात सुद्धा लस टप्प्याटप्याने वितरण करून लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोरची तालुक्यात आलेली लस साठवणूक उपकरणाअभावी परत पाठविण्यात आली. त्यामुळे आणखी किती दिवस येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीपासून वंचित राहावे लागेल, असा प्रश्न येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.

२३ जानेवारीला कोविड लस ठेवण्यासाठी शीत साठवणूक उपकरण जिल्हास्तरावरून कोरची तालुक्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु कोरची ग्रामीण रुग्णालयात लस साठवणुकीची व्यवस्था नसल्याने हे उपकरण रुग्णालय प्रशासनाने जिल्हास्तरावर परत पाठविले. कोरची ग्रामीण रुग्णालय नेहमीच ढिसाळ नियाेजनामुळे चर्चेत असते. येथील ग्रामीण रुग्णालयात स्थायी वैद्यकीय अधीक्षक नसून गडचिरोलीत राहत असलेल्या डॉ. बागराज धुर्वे यांच्याकडे सध्या प्रभार दिलेला आहे. परंतु पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक नसल्याने येथील कारभार वाऱ्यावर आहे. स्थायी वैद्यकीय अधीक्षक असल्यास आरोग्य सेवा सुरळीत होऊन रुग्णांना याेग्य सेवा मिळेल. मात्र ढिसाळ नियाेजनाचा फटका रुग्णांना बसत आहे.

बाॅक्स

तालुक्यात ३०० वर आराेग्य कर्मचारी

तालुक्यातील आरोग्य विभागात दोन आरोग्य केंद्र, तीन पथक, एकवीस प्राथमिक उपकेंद्र असून यामध्ये जवळपास ३०० च्यावर आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात याच आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशावर्कर आदींनी कोरोनाची भीती न बाळगता तालुक्यात आरोग्य सेवा दिलेली आहे. मात्र यांनाच कोविड लस मिळत नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.

काेट...

लस साठवणूक व वितरणाची सर्व व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाकडे असल्याने नेमके आणखी किती दिवस वेळ लागेल, हे सांगता येणार नाही किंवा याबाबत कोरची ग्रामीण रुग्णालयातून कुठलाही संदेश आलेला नाही.

विनाेद मडावी, तालुका आराेग्य अधिकारी काेरची

काेट...

सध्या कुठल्याही लसीसाठी शीत उपकरण पाठवण्यात आलेले नाही. शीत साखळी उपकरण जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाठविल्याने ग्रामीण रुग्णालयात उतरविण्यात आलेले नाही. तसेच ग्रामीण रुग्णालयात आवश्यक प्रमाणात शीत उपकरणे आहेत. दिल्लीच्या पोर्टलवर जोपर्यंत कोरची तालुक्याचे नाव येणार नाही तोपर्यंत लसीची साठवणूक व वितरण करता येणार नाही.

डाॅ. बागराज धुर्वे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय काेरची